Home नाशिक पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण !

पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण !

116

आशाताई बच्छाव

IMG-20230126-WA0081.jpg

पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण !

भास्कर देवरे (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नाशिक : संपूर्ण देशभरात आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असून देशभर उत्साहाचं वातावरण आहे. तसेच नाशिकमध्ये देखील मोठ्या उत्साहाचे वातावरण असून शरणपूर रोडवरील पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांनी यावेळी अतिशय नेत्रदीपक असे संचलन केले.