Home पुणे सांगवीतील पी.डब्ल्यू. डी. मैदानावर भरलेल्या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी

सांगवीतील पी.डब्ल्यू. डी. मैदानावर भरलेल्या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी

100

आशाताई बच्छाव

IMG-20230121-WA0027.jpg

सांगवीतील पी.डब्ल्यू. डी. मैदानावर भरलेल्या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी

पिंपरी /पुणे, प्रतिनिधी उमेश पाटील युवा मराठा न्युज:
भारत सरकारच्या वस्त्रालय मंत्रालयाच्या विकास आयुक्त कार्यालय (हस्त शिल्प) द्वारा आणि सांगलीच्या चरक स्वास्थ्य बहुद्देशीय संस्थच्या वतीने आयोजित ‘क्राफ्ट बझार’ या हस्त कलेतून बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले. दरम्यान, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी प्रदर्शनातील विविध वस्तूंच्या स्टॉलला भेट देऊन खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
नवी सांगवीतील पी.डब्ल्यू. डी. मैदानावर हे प्रदर्शन भरले असून दिनांक 20 जानेवारी टे 29 जानेवारी 2023 असे दहा दिवस सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये प्रवेश विनामूल्य आहे. पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारत सरकारच्या वस्त्रालय मंत्रालयाच्या विकास आयुक्त कार्यालयाचे (हस्त शिल्प) सहाय्यक संचालक चंद्रशेखर सिंग, माजी नगरसेवक अनिकेत काटे, सौ. शीतल शीतोळे, चरक स्वास्थ्य बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किरण चव्हाण, सचिव बी.एएस , चव्हाण, प्रकल्प संचालक रमेश मनगेनी, सदस्य स्नेहलता चव्हाण, जेष्ठ नागरिक संघाचे जयवंतमामा मोरे, नृत्य कलाकार फिरोज मुजावर आदी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी प्रदर्शनातील सर्व स्टॉलला भेट देऊन प्रदर्शनातील हस्तकलेपासून बनविण्यात आलेल्या वस्तूंची माहिती घेतली.
भारत सरकारच्या वस्त्रालय मंत्रालयाच्या विकास आयुक्त कार्यालय (हस्त शिल्प) द्वारा एम.एस.एस. योजनेंतर्गत हा उपक्रम राबवला जातो. हस्तकला कारगिरांनी बनविलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या मागचा हेतू आहे.
बी. एस. चव्हाण यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन संचालक रमेश मनमेनी यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी नृत्य कलाकार फिरोज मुजावर यांनी सादर केलेल्या गणेश वंदनाने उपस्थितांची मने जिंकली.

Previous articleपारखेड येथे जम्मा जागरण,भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा
Next articleब्रेकिंग बातमी..! नाशिकच्या पंचवटी परिसरात हत्या ?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.