Home बुलढाणा पारखेड येथे जम्मा जागरण,भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा

पारखेड येथे जम्मा जागरण,भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20230121-WA0029.jpg

पारखेड येथे जम्मा जागरण,भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर)

खामगाव तालुक्यातील पारखेड येथे विशाल जम्मा जागरण चे आयोजन करण्यात आले असून,भाविकांनी उपस्थित राहून या जम्मा जागरण चा लाभ घ्यावा असे आवाहन रामदेवबाबा समिती कडून करण्यात आले आहे
कलयुग चे अवतारी,राजस्थान राज्यातील रामदेवरा या नगरी मधील अवतारी रामदेवबाबा यांच्या जीवन पटावर आधारित विशाल जम्मा जागरण चे आयोजन दि 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पासून खामगाव तालुक्यातील पारखेड येथील श्री रामदेवबाबा व परशरामबाबा संस्थान येथे होणार आहे.छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील 13 वर्षीय प्रसिद्ध जम्मा गायक चि हार्दिक व्यास यांच्या मधुर वाणीतून श्री रामदेवबाबा यांच्या जीवन पाटावर कथा, जम्मा जागरण, संगीतमय भजन,सची ज्योत,आरती,होणार आहे,तसेच दुपारी 1 ते 4 महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले असून,याचा भाविक भक्तांनी अवश्य लाभ घेऊन दर्शन घ्यावे व उपस्थित राहून या कार्यक्रम ची शोभा वाढवावी असे आवाहन रामदेवबाबा सेवा समिती जळगाव जामोद,संग्रामपूर,रामदेवबाबा व परशराम बाबा संस्थान पारखेड फाटा,गोवर्धनदास चांडक (जामोद)डा हर्षद केला (अकोला) भूषण राठी (पुलगाव) यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here