Home नाशिक ब्रेकिंग बातमी..! नाशिकच्या पंचवटी परिसरात हत्या ?

ब्रेकिंग बातमी..! नाशिकच्या पंचवटी परिसरात हत्या ?

28
0

आशाताई बच्छाव

IMG-20230121-WA0025.jpg

 

ब्रेकिंग बातमी..! नाशिकच्या पंचवटी परिसरात हत्या ?

 

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज)

शहराच्या पंचवटी परिसरात अज्ञात
इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच
खळबळ उडाली आहे.
मखमलाबाद रोड परिसरात असलेल्या पाठाजवळ हा बेवारस मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह कोणाचा आहे? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाहीये. मात्र मृतदेहाच्या अवस्थेवरून हे प्रकरण खुनाचे असल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.
परिसरात असलेल्या मखमलाबाद रोड पाटाजवळ हा बेवारस मृतदेह सापडला असून डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. मृतदेह कोणाचा आहे, हे सर्व प्रकरण नेमके काय आहे, ही हत्या किं आणखी काही असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरीत असून पोलीस घटनेचा तपास करत आहे.
मृतदेहाच्या अवस्थेवरून हे प्रकरण खुनाचे असल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. तरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा छडा लावण्याचे काम सुरु आहे. दरम्यान गुन्हेगारीच्या घटनांमध्ये अजून एका गुन्ह्याची भर पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Previous articleसांगवीतील पी.डब्ल्यू. डी. मैदानावर भरलेल्या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी
Next articleवीरभद्रेश्वर विवाह सोहळ्यास भाविकांचा उदंड प्रतिसाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here