आशाताई बच्छाव
भाऊलाल तांबडेंचा प्रत्येक डाव यशस्वी ठरणार आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला गड सर करून देणार!
युवा मराठा न्यूज . प्रतिनिधी सागर (गणेश) कांदळकर
दिंडोरी तालुकाध्यक्ष अमोल कदम याना पदभार देऊन थोड्याच दिवसात मा.भाऊलाल तांबडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपली कमाल त्यांनी दाखवली दिंडोरी तालुका हा आदिवासी तालुका म्हणून परिचित असला तरी बागायती शेती आणि कारखानदारीमुळे सधन वर्गही तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहे. तालुक्याच्या राजकारणात प्रभाव असलेल्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये या सधन वर्गाचेच वर्चस्व दिसते. परिणामी सामान्य माणूस प्रत्यक्ष प्रक्रियेपासून दूर ठेवला जातो, अशी मानसिकता निर्माण झालेल्या या तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना या नव्या राजकीय पक्षाविषयी सहानुभूती निर्माण होऊ शकते. म्हणूनच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, तालुक्याचे सहकार महर्षी श्रीराम शेटे, माजी आमदार रामदास चारोस्कर आणि काही प्रमाणात केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या नेतृत्व गर्दीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे कशाप्रकारे स्वतःचे नेतृत्व जन माणसात रुजवतात, यावरच तालुक्याचे राजकीय समीकरण अवलंबून आहे.
‘ महानगरपालिका, जिल्हा मधरिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार, अशी चर्चा सुरु झाल्याने सर्व राजकीय पक्षांच्या पातळीवर सोयीनुसार हालचाली गतिमान झाल्या आहेत. यातच शिंदे गटाला आपले अस्तित्व सिद्ध करण्याचे आवाहन उभे असल्याने जिल्ह्यात शिंदे गटाचे अस्तित्व प्रबळपणे उभे करण्याचे आवाहन जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी स्वीकारले असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका व नगरसेवकांचा होत असलेला प्रवेश शिंदे गटासाठी कितपत लाभदायक ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर शिंदे गटाने आपले पहिला अस्तित्व सिद्ध करण्यासाठी राज्यभरात चळवळ तत्वावर योजना आखली. त्यावेळी नाशिक जिल्ह्याची जबाबदारी शिवसेनेचे धडाडीचे व आक्रमक व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या पूर्व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आताचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तांबडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तळागाळात काम करत जिल्हाप्रमुख पदापर्यंत आपले अस्तित्व सिद्ध करणारे भाऊलाल तांबडे यांच्याकडे संघटन कौशल्य असल्याने ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली गेल्याच्या प्रतिक्रिया
व्यक्त होत आहेत.
हे खरं असलं तरी राजकारणात काल काय होते, यापेक्षा वर्तमानात यावेळीही दिसला. त्यांना आपला करिष्मा दाखवून येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत ही निवड सार्थ ठरवावी लागणार
आहे. त्यादृष्टीने बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी प्रत्येक तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तयारी सुरू करीत टप्पा यशस्वी गाठला आहे. स्वतालुका म्हणजेच दिंडोरी तालुक्यात आपले मूळ पक्के करण्यावर त्यांचा अधिक कटाक्ष दिसत आहे.दिंडोरी तालुका राष्ट्रवादी यूवक उपाध्यक्ष सोनू काठे यांचा समवेत विश्वास गुंजाळ माधव घुमरे रुपेश वाघ धोंडीराम सुर्यवंशो बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश केला.