Home युवा मराठा विशेष आता होणार खरा पर्दाफाश! सब गोलमाल है भाई गोलमाल है! व-हाणे ग्रामपंचायतीचा...

आता होणार खरा पर्दाफाश! सब गोलमाल है भाई गोलमाल है! व-हाणे ग्रामपंचायतीचा अजब गजब कारभार!!                                             

124

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

Screenshot_20221223-071216_Facebook.jpg

आता होणार खरा पर्दाफाश! सब गोलमाल है भाई गोलमाल है! व-हाणे ग्रामपंचायतीचा अजब गजब कारभार!!                                               मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क)-शासकीय कामकाजाच्या त-हा या अजबच असतात.धन्याला धतुरा अन चोराला मलिदा अशा पध्दतीने ग्रामपंचायतीचे कारभारी शासनाच्या सचिवांना अर्थातच ग्रामसेवकांना सोबत घेऊन,त्यांच्याच आशिर्वादाने अजब गजब कारभार करुन गावकीच्या राजकारणात बजबजपूरी तयार करुन गावांचे पार विकासाऐवजी भकासतेकडे घेऊन जाणाऱ्याचा खरा पर्दाफाश आता होणारच!मालेगांव तालुक्यात असलेल्या व-हाणे ग्रामपंचायतीचा अजब गजब कारभाराचा उतम नमूना म्हणजे कागदोपत्री खोटया व बनावट सहया करुन शासनाच्या डोळ्यात धुळफेक करण्याबरोबरच सामान्य जनतेची घोर पिळवणूक गाव पुढारी असलेल्या सतेचा माज चढलेल्यांकडून कसा सुरु आहे.याचेच अधिकृत पुरावे युवा मराठा न्युजच्या हाती लागले आहेत.गावात होणाऱ्या ग्रामसभा देखील बोगस व बेकायदेशीर कशा असतात याचे उदाहरण द्यायचे झाले तरी सन २०१९ मध्ये व-हाणेत ग्रामसभेला हजर नसलेल्या व्यक्तीची खोटी व बनावट सही प्रोसिडिंग बुकात करुन शासनाच्या डोळ्यात धुळ फेकून दिशाभूल करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे,तर प्रोसिडिंग बुकावर एका व्यक्तीला एकच सही करण्याचा अधिकार असतो,तरीदेखील एकाच व्यक्तीच्या प्रोसिडिंग बुकात दोन ठिकाणी सहया घेण्याचा उद्देश म्हणजे ग्रामपंचायत किती कर्तव्यतत्पर आहे हे सिध्द होते.याच ग्रामपंचायतीचे आणखी अजब गजब नमूने व गैरकारभाराचे कारस्थान म्हणजे गावातीलच एका सार्वजनिक वाचनालयाला बेकायदेशीर सुमारे एक गुंठा गावठाण जागा इमारत बांधण्याकामी नमूना नं.८ नुसार खिरापतीसारखी बहाल केली.आणि सगळ्यात मोठी आश्चर्यचकित करणारी बाब अशी की,ज्या व-हाणे गावातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी शोष खड्डा ग्रामपंचायतीने बनविलेला आहे.अगदी तीच जागा जनतेच्या व शासनाच्या डोळ्यात धुळफेक करुन सदर वाचनालयाला देण्यात आलेली आहे,त्याशिवाय गावातील एका आदिवासी समाजाच्या मिनाबाई सोनवणे नामक महिलेस सुमारे ३० बाय २९ इतकी जागा गावठाणात ग्रामपंचायतीने सन २०१९ साली दिलेली आहे तसा नमूना नं.८ व त्या महिलेकडून करवसुलीच्या नावाखाली १४७ रुपये इतकी करवसुली केलेली आहे,असे असतानासुध्दा आता त्याच आदिवासी महिलेच्या जागेचा मालक ग्रामपंचायत कोणत्या अधिकाराने व नियमाने झाली?एकदा गरीब आदिवासी महिलेला दिलेली जागा व त्यासाठी दिलेला उतारा व कर आकारणी पावती सबंधित महिलेकडे असूनही ग्रामपंचायत पुन्हा त्याच जागेचा बनावट उतारा तयार करुन ती जागा ग्रामपंचायतीची असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न कुणाच्या आशिर्वादाने करीत आहे.कागदोपत्री बोगस व लबाडीची कामे करुन व-हाणे ग्रामपंचायत प्रशासन नेमकी कोणती कर्तबगारी करीत आहे असाही संशोधनाचा प्रश्न यानिमिताने पुढे येतो आहे,ग्रामपंचायतच्या प्रत्येक कागदोपत्री कामकाजात लबाडी व खोटेपणाचा कळस गाठला असल्याचे दिसून येते.एका बाजूला १५ नोव्हेंबर २०२२ रोजी व-हाणे गावात झालेल्या बोगस व खोटया ग्रामसभेत ज्या संस्था शासनाकडे नोंदच नाहीत.अशाही संस्थाचे खोटे नाटे अर्ज विरोधाला विरोध करण्यासाठी बनवून घेण्यात आले,व त्या बोगस ग्रामसभेत गावात गावठाण जागाच शिल्लक नसल्याचे भासविण्याचा खोटा कांगावा निर्माण केला गेला,तर दुसऱ्या बाजुला सन २०२० पासून आश्रयआशा फाऊंडेशन व युवा मराठा परिवाराच्या ताब्यात व वापरात असलेली जागा दुसऱ्याच्या घशात घालण्यासाठी केवढा मोठा आटापिटा चाललेला आहे,त्यासाठी खोटया सहया काय?खोटी कागदपत्रे काय?सारीच बनवाबनवी चाललेली आहे,मात्र या सगळ्या भानगडींचा पंचनामा करुन कायदेशीर ४२० चा गुन्हा दाखल करण्यासाठी आता युवा मराठा महासंघ सज्ज झाला आहे.प्रतिक्षा फक्त ६ जानेवारीची त्याचवेळी होणार आता संघर्षातून पर्दाफाश नकली बुरखा पांघरलेल्या ढवळ्या बगळ्यांचा.!

Previous articleमालेगाव तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्षपदी  श्री.टी. एम.बच्छाव तर सचिवपदी प्रदिप खताळ यांची निवड
Next articleभाऊलाल तांबडेंचा प्रत्येक डाव यशस्वी ठरणार आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला गड सर करून देणार!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.