आशाताई बच्छाव
उंच उडी क्रीडा स्पर्धेत कमळेवाडी आश्रम शाळेचा मारुती गरसुळे जिल्ह्यात प्रथम !
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड – जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने सध्या जिल्हास्तरीय स्पर्धा नांदेड येथे सुरू असून परवा झालेल्या ॲथलेटिक्स उंच उडी क्रीडा प्रकारात माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी चा विद्यार्थी मारुती गरसुळे याने चमकदार कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.
यापूर्वी मारुती गरसुळे यांनी तालुकास्तरीय ॲथलेटिक्स उंच उडी क्रीडा प्रकारात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला होता. त्यानंतर त्याची जिल्हास्तरीय उंच उडी स्पर्धेसाठी निवड झाली होती.
नांदेड येथे परवाला झालेल्या ॲथलेटिक्स उंच उडी क्रीडा प्रकारात मारुती गरसुळे यांने आपली विजयाची परंपरा कायम राखत जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे.
मारुती गरसुळे याच्या या यशाबद्दल माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक संदीप गेटकेवार, प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आर.डी. राठोड , संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शमशुद्दीन शेख, क्रीडा विभाग प्रमुख उत्तम कुमार हनमंते, सहमार्गदर्शक लक्ष्मण डावकरे, संदीप गुंटूरकर , जाधव सर, नामदेव शिंदे, शेख जाकीर संदीप कदम , प्रकाश जाधव आदींनी अभिनंदन केले आहे.






