Home गडचिरोली ग्रामपंचायत चकपिरंजीच्या वतीने तहसीदारांना निवेदन

ग्रामपंचायत चकपिरंजीच्या वतीने तहसीदारांना निवेदन

207

आशाताई बच्छाव

IMG-20221121-WA0109.jpg

ग्रामपंचायत चकपिरंजीच्या वतीने तहसीदारांना निवेदन

सावली/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मौजा चकपिरंजी गावातील नागरिकांना तहसीलदारांकडून अतिक्रमण संदर्भात नोटीस देण्यात आले असून दि. 22/11/2022 पर्यंत अतिक्रमणधारकांनी अतिक्रम न हटवल्यास कारवाई करण्यात येईल असे संबंधित नोटीसमध्ये नमूद असल्याने संपूर्ण गावकरी धास्तावले असून गावात भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून वास्तव्यात असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण हटवून नये याकरिता आज ग्रामपंचायत चकपिरंजीच्या वतीने ग्रामसभा घेऊन ठराव घेण्यात आला व तसे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी सौ. मनीषा चिमुरकर माजी सदस्या जि.प. चंद्रपूर चकपिरंजीचे सरपंच सौ. उषाताई गेडाम ग्रामपंचायत सदस्य अरविंद भैसारे ग्रामपंचायत सदस्य अमृत चौधरी मोतीराम चिमुरकर करणी स्वामी प्रभाकर चौधरी संजय मडावी रवी नन्नावरे मोहन भोपये सौ. वच्छलाबाई कोडापे संजय मेश्राम व असंख्य गावकरी उपस्थित होते.

Previous articleसांसदीय संकुल परियोजना संबंधी मान.खासदार अशोकजी नेते अभ्यास दौऱ्या प्रसंगी……..
Next articleसंभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.