राजेंद्र पाटील राऊत
देवळा पोलिसांच्या आशिर्वादाने .! वासोळच्या कोलती नदीकाठी;ज्ञानेश्वरच्या सट्ट्या मटक्याला गर्दी मोठी!!
राजेंद्र पाटील राऊत
(युवा मराठा न्यूज नेटवर्क )
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या वासोळ गावाशेजारील कोलती नदीकाठी असलेल्या बंधारा (धरणालगत) ज्ञानेश्वर पवार व लोहणेर येथील भारत निकम या दोघा भागीदारी करीत असलेल्या सट्टा माफीयांची सध्या मोठीच चलती असल्याचे दिसून येत आहे.वास्तविक सध्या नाशिक जिल्ह्यात पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊन खांदेपालट झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश अवैध व बेकायदेशीर सुरु असलेले धंदे बंद झालेले आहेत,तरीदेखील ज्ञानेश्वर व भारत ही जोडीगोळी नेमकी कोणत्या धाडसाने व कोणत्या पोलिसांच्या आशिर्वादाने राजरोस सट्टा मटका जुगार नदीकाठी चालवून गोरगरिबांच्या संसाराची राखरांगोळी करीत आहेत.या सट्टा मटका जुगारामुळे वासोळ परिसरात शेतकऱ्यांना मजुरीसाठी कामगार मिळणे अवघड झालेले असून,गरीब व सामान्य नागरीक या जुगारामुळे देशोधडीला लागत असल्याचे एकंदरीत चित्र असून,कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस प्रमुख शहाजी उमाप साहेब यांनी तात्काळ या अवैध व बेकायदेशीर जुगार अड्डयाचा समूळ नायनाट करावा अशीच मागणी नागरिकामधून होत आहे.