Home गडचिरोली 11 नोहेंबर शुक्रवारला तालुका खरेदी विक्री संघावर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

11 नोहेंबर शुक्रवारला तालुका खरेदी विक्री संघावर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

120

आशाताई बच्छाव

IMG-20221109-WA0067.jpg

11 नोहेंबर शुक्रवारला तालुका खरेदी विक्री संघावर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

चामोर्शी येथील संताजी क्रीडांगण शिवम अगरबत्ती प्रकल्प येथून शुक्रवार दिनांक 11 नोहेंबर 2022 रोज शुक्रवारी तालुका खरेदी विक्री सह. मर्या चामोर्शी येथे भागधारक सभासद यांची नावे बेकायदेशीर रित्या मतदार यादीतून वगळण्यात आल्या बद्दल व येथील अनेक शेतकऱ्यांचे सभासदत्व चामोर्शी खरेदी विक्री संस्थेतून रद्द केल्याच्या निषेधार्थ
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते ,युवा नेते स्वप्नील भाऊ वरघंटे यांचे मार्गदर्शनात नगरसेवक आषिश भाऊ पिपरे, रमेश अधिकारी यांच्या पुढाकाराने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या आधी चामोर्शी येथे झालेल्या जाहीर सभेत खासदार अशोक जी नेते यांनी चामोर्शी येथील खरेदी विक्री संघात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायावर नाराजी व्यक्त केली होती व जोपर्यंत खरेदी विक्री संघाची निवडणूक रद्द होणार नाही तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही व शासन स्तरावर आपण पाठपुरावा करून तालुक्यातील भागधारक शेतकरी शेतमजुर यांना न्याय मिळवून देण्यासाठी व आजपर्यंत खरेदी विक्री संघात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी प्रामुख्याने तालुक्यातील बेकायदेशीर रद्द करण्यात आलेल्या सभासदांना सभासदत्व मिळवून देणे,मतदार यादीतून वगळण्यात आलेले पुन्हा समाविष्ट करण्यात यावे ,नवीन सभासदांची नावे नोंदणी करणे मय्यत सभासदांच्या वारसदारांना सभासदत्व मिळवून देणे व अनेक प्रमुख अन्यायकारक विषयावर सदर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे व हा अन्याय सहन केल्या जाणार नाही असा इशारा दिला खासदार अशोक भाऊ नेते
युवा नेते स्वप्नील भाऊ वरघंटे नगरसेवक आशीष भाऊ पिपरे, रमेश अधिकारी यांनी दिला आहे या धडक मोर्चाला यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील खरेदी विक्री संघातील अन्यायग्रस्त भागधारक शेतकरी शेतमजूर व विविध गावातील शेकडो शेतकरी शेतमजूर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, खरेदी विक्री संघात अन्याय झालेल्या भागधारक शेतकरी शेतमजूर यांनी केला आहे

Previous articleभूमी अभिलेख कार्यालयाचा महाप्रताप! एकाच्या मोजणीने, दुसऱ्या शेतकऱ्यांचा केला सातबारा हद्दपार
Next article●करंजाड येथे मोफत ह्रदयरोग तपासणी शिबीर संपन्न ●
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.