Home गडचिरोली पुर बूडी मदतीपासून वंचित राहिलेल्यांचे पुन्हा सर्व्हेक्षण होणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी...

पुर बूडी मदतीपासून वंचित राहिलेल्यांचे पुन्हा सर्व्हेक्षण होणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

123

आशाताई बच्छाव

IMG-20221025-WA0077.jpg

पुर बूडी मदतीपासून वंचित राहिलेल्यांचे पुन्हा सर्व्हेक्षण होणार

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश                                                         गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

प्रलंबित कामांसाठी व नवीन प्रस्तावित कामांसाठी निधी उपलब्ध करून द्या

गडचिरोली पोलीस विश्रामगृहात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्याशी गडचिरोली जिल्ह्याच्या विविध प्रश्नावर आमदार देवरावजी होळी यांची चर्चा

गडचिरोली, चामोर्शी व धानोरा येथील प्रशासकीय भवनांसाठी निधी उपलब्ध करून देणार

गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापिठाच्या जागेचा प्रश्न, जलसिंचनाच्या समस्या, इत्यादी प्रलंबित कामे तसेच गडचिरोली चामोर्शी व धानोरा येथील प्रस्तावित प्रशासकीय भवनांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची विनंती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली असता आपल्या मागणीनुसार लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी आमदार महोदयांना आश्वासित केले. तसेच पूर् बुडी मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे पुन्हा सर्वेक्षण करून त्यांना तातडीने मदत करण्याबाबतचे निर्देश मुखयमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर बुडीची शासकीय मदत मिळणे सुरू झाली आहे.मात्र काही शेतकऱ्यांना प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे व बेजबाबदारपणामुळे मदतीपासून वंचित राहावे लागले आहे ही बाब आमदार महोदयांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी याबाबत तातडीने सर्वेक्षण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश केले

आमदार महोदयांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे गडचिरोली पोलीस विश्रामगृहात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यानंतर त्यांच्याशी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली

गोंडवाना विद्यापीठाच्या जमिनीच्या अधिग्रहणाचा प्रश्न अत्यंत गंभीर असून त्याकडे तातडीने लक्ष देऊन तो निकाली काढण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले धानोरा व चामोर्शी येथील प्रशासकीय भवनांसाठी प्रत्येकी ५ कोटी तर गडचिरोली येथील प्रशासकीय भवनासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासनही त्यांनी आमदार महोदयांना दिले.

Previous articleमा.खा.अशोकजी नेते यांची घोट येथे सांत्वनपर भेट
Next articleआनंदाचा शिधा नव्हे चॉकलेट..!जिल्ह्यात अनेक गावांत शिधा मिळालाच नाही; लाभार्थ्यांची दिवाळी कोरडीच..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.