Home नांदेड येवती येथील पब्लिक स्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न.

येवती येथील पब्लिक स्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न.

121

आशाताई बच्छाव

IMG-20221008-WA0047.jpg

येवती येथील पब्लिक स्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क )

मुखेड – येवती येथील श्री सद्गुरु नराशाम महाराज पब्लिक स्कूल शाळेमध्ये आज पालक मेळावा मोठ्या थाटात संपन्न झाला.
येवती येथील श्री सद्गुरु नराश्याम महाराज पब्लिक स्कूलच्या वतीने घेण्यात आलेल्या पालक मेळाव्याला पालकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
पब्लिक स्कूलच्या वतीने विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्यात कुठेतरी सुसंवाद व्हावा व पालकांना आपल्या मुलाची प्रगती जाणून घेता यावे यासाठीच पालक मेळावा ठेवण्यात आल्याचे पब्लिक स्कूलचे संचालक आनंदराव राठोड सर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. या पालक मेळाव्याला येवती आजूबाजूच्या खेड्यातील सर्व पालकांची आवर्जून प्रमुख उपस्थिती होती. तर या पालक मेळाव्यात अनेक पालकांनी आपले मनोगतही व्यक्त केले आहे . यावेळी पब्लिक स्कूलचे शिक्षक मुख्याध्यापक संचालक गावातील नागरिक पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Previous articleमार्कंडा देव परिसरात बेल व रुद्राक्षाचे वृक्षारोपण वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा पुढाकार
Next articleशिवसेनेचा धनुष्यबाण गोठवल्याने शिवसैनिकासह सर्वसामान्यही झाले सोशल मीडियावर भावुक.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.