Home नांदेड नांदेड जिल्ह्यात 183 गायवर्ग पशुधन लम्पी बाधित 3 लाख 35 हजार 223...

नांदेड जिल्ह्यात 183 गायवर्ग पशुधन लम्पी बाधित 3 लाख 35 हजार 223 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण

141

आशाताई बच्छाव

Screenshot_20220603-192246_Facebook-removebg-preview-1.png

नांदेड जिल्ह्यात 183 गायवर्ग पशुधन लम्पी बाधित 3 लाख 35 हजार 223 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका)  :- नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 183 एवढी झाली असून जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला आहे. शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्हाभर लसीकरणावर नियोजनबद्ध भर देऊन आज रोजी 17 हजार 405 एवढ्या पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. आजवर जिल्ह्यात एकुण 3 लाख 35 हजार 223 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे.

लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 45 गावे लम्पी बाधित आहेत. या 45 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 22 हजार 715 एवढे आहे. यातील 183 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 283 एवढी आहे. एकुण गावे 328 झाली आहेत. या बाधित 45 गावाच्या 5 किमी परिघातील 328 गावातील (बाधित 45 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 92 हजार 400 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 16 एवढी झाली आहे. उपलब्ध लस मात्रा 4 लाख 8 हजार 250 एवढी असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Previous articleउत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित अभिजित राऊत नांदेड जिल्हाधिकारी पदावर रुजू.
Next articleउंद्री प.दे. येथील जिल्हा परिषद शाळेस शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर व शेगडी उपलब्ध.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.