Home नाशिक व-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा!

व-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा!

149

आशाताई बच्छाव

FB_IMG_1664119931936.jpg

व-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा!
मालेगांव,(प्रतिनिधी)- व-हाणे,ता.मालेगांव येथील पत्रकार भवन जागेच्या प्रश्नासह गावातील दलित आदिवासी वस्ती सुधार निधीची चौकशी व वाचनालयास दिलेली बेकायदेशीर जागेची कसून चौकशी करण्याबरोबरच वादग्रस्त ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांना तात्काळ निलंबित करण्याच्या मागणीसाठी काल मालेगांव पंचायत समिती येथे राष्ट्रीय पँथर सेनेने निवेदन दाखल केले.
सेनेचे जिल्हाध्यक्ष दिपकभाई सोनवणे आपल्या निवेदनात म्हटले आहे की,राष्ट्रीय युवा मराठा महासंघाने पुकारलेल्या आमरण उपोषण आंदोलनात दिलेल्या लेखी आश्वासनाची त्वरीत अंमलबजावणी करुन आश्वासनपूर्ती करावी अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर राष्ट्रीय पँथर सेनेच्या नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष दिपकभाई सोनवणे यांनी दिला आहे.यावेळी राष्ट्रीय पँथर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक
Next articleजळगावमधील मराठा मोर्चात पिंपरीतून शेकडो बांधव होणार सहभागी : सतीश काळे.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.