आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय
पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांचे २२ सप्टेंबरपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण
मालेगांव,- व-हाणे ,ता.मालेगांव येथील ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे यांच्या मनमानी व गैरकारभाराविषयी वारंवार लेखी तक्रारी केल्यावरही त्यांचेवर प्रशासनाकडून अद्याप कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या वतीने येत्या गुरुवार पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांनी दिला आहे. संबधिताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,व-हाणे गावी युवा मराठा परिवाराची शासकीय जागेवर पाणपोई असून,त्या पाणपोईचे उदघाटन दस्तुरखुद्द ग्रामसेविका सांळुखे यांनी करुन आणि सदरची जागा युवा मराठाच्या पत्रकार भवनास देण्याचे मान्य करुन त्यासाठी पैसे घेऊनही टाळाटाळ करीत असल्याने व गावातच एका वाचनालयास बेकायदेशीररित्या शासकीय जागा बहाल केल्याचा प्रताप विस्तारधिकारीच्या चौकशीत उघड होऊनसुध्दा अद्याप संबंधित ग्रामसेविकेवर कुठलीही कारवाई झालेली नसल्याने आमरण उपोषण छेडत असल्याचा आपला निर्णय ठाम असल्याचे पत्रकार राऊत पाटील यांनी सांगितले .