Home नाशिक नांदगाव नगरपरिषदेने भारत सरकारच्या स्‍वच्‍छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग या...

नांदगाव नगरपरिषदेने भारत सरकारच्या स्‍वच्‍छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग या देश पातळीवरील स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला

104

आशाताई बच्छाव

IMG-20220917-WA0031.jpg

नांदगाव नगरपरिषदेने भारत सरकारच्या स्‍वच्‍छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग या देश पातळीवरील स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला                        नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे                       आज दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी शहरातून भव्य स्वच्छता रॅली आयोजित करण्यात आली होती. सदरील रॅली नगरपरिषद प्रांगनातुन सकाळी शहरातील तरुण तसेच महिला, विविध शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक , सफाई कर्मचारी आणि नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
त्यानंतर रॅलीचे खास आकर्षण असणाऱ्या बाल वारकरी मंडळाच्या बालवारकरी यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे अशा अभंगातुन व ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या साथीने रॅलीची सुरवात करण्‍यात आली. हातात झाडू घेऊन सर्व सहभागी नागरिक स्वच्छतेच्या घोषणा देत निघाले त्यानंतर शहरातून वाहणाऱ्या शाकांबरी नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली त्यानंतर शनीमंदिर येथील नगरपरिषदेचे उद्यान येथे स्वच्छता मोहीम राबवत पुढे हुतात्मा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक येथून नांदगाव नगरपरिषद प्रांगणात येवून रॅलीचा शेवट करण्यात आला याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग नोंदविला होता.

Previous articleपशुधनातील लम्पी आजाराबाबत पशुपालकांनी गोठ्याची स्वच्छता व दक्षता घेणे आवश्यक – खासदार प्रताप पाटील चिखलीकर
Next articleनांदगाव महाविद्यालयात महाविद्यालयीन स्तरावर अविष्कार स्पर्धा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.