Home कोल्हापूर कोल्हापूर येथील प्रसिद्ध गोकुळ दूध संघाची आज सर्वसाधारण वार्षिक सभा होणार!

कोल्हापूर येथील प्रसिद्ध गोकुळ दूध संघाची आज सर्वसाधारण वार्षिक सभा होणार!

135

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0019.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे :कोल्हापूर येथील प्रसिद्ध गोकुळ दूध संघाची आज सर्वसाधारण वार्षिक सभा होणार! कोल्हापुर येथील प्रसिद्ध गोकुळ दूध संघची साधारण सभा दुपारी एक वाजता पार पडणार आहे .ही सभा खूप रंगदार होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्याचबरोबर ही सभा वादळी होण्याची संकेत आहेत .कारण असे की गोकुळ दूध संघाची झालेली सत्ता बदल आणि महाराष्ट्र मध्ये झालेल्या सत्ता बदलांमध्ये या दोन्ही सत्ता बदलाचा परिणाम या गोकुळ दूध संघाशी संबंधित आहे असं सूत्रांची माहिती आहे .त्यामुळे सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये गोकुळ संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सांगितले की ,आमचं एकच मत आहे की शेतकऱ्यांच्या सर्वसाधारण प्रश्नांवर त्यांनी व्यवस्थित उत्तर द्यावं व हे उत्तरे समाधानकारक असावेत असे आमची विनंती आहे. खरंतर गोकुळ दूध संघामध्ये हा सामना महाडिक विरुद्ध सतेज पाटील असा रंगणार आहे. माध्यमांशी बोलताना संघाच्या संचालिका शोमिका महाडिक यांनी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर वाचा फोडली व या प्रश्नावर ती व्यवस्थित उत्तर मिळतील अशी आशा करून या दुपारी एक वाजता होणाऱ्या सभेस आम्ही उपस्थित राहून असे त्यांनी सांगितले. एकंदरीत काय तर सत्ता बदलाचे परिणाम या अगोदर संघाच्या सर्वसाधारण बैठकीत दिसून येणार आहेत हे नक्की.

Previous articleतीन जहाल नक्षलींना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश…. शासनाने जाहिर केले होते एकुण 10 लाख रुपयांचे बक्षीस
Next articleधाराशिव साखर कारखान्यावरती आयकर विभागाचा छापा संपला!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.