Home गुन्हेगारी काय ती येडया बाभळीची झाडी,काय ती दोध्याड नदीथडी;काय ती दाभाडी..सारेच ओक्के! सट्टा...

काय ती येडया बाभळीची झाडी,काय ती दोध्याड नदीथडी;काय ती दाभाडी..सारेच ओक्के! सट्टा माफीया पुढे नेमके कोण झुके?

178

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220828-165603_Google.jpg

काय ती येडया बाभळीची झाडी,काय ती दोध्याड नदीथडी;काय ती दाभाडी..सारेच ओक्के! सट्टा माफीया पुढे नेमके कोण झुके?
_____________________
राजेंद्र पाटील -राऊत
मुख्य संपादक युवा मराठा
_____________________
मालेगांव– नाशिकच्या मालेगांव तालुक्यातील दाभाडी गाव हे राजकारणात अत्यंत प्रगत व अग्रेसर म्हणून ओळखले जाते.तसेच या गावातील पत्रकारिताही अत्यंत परखडपणे कार्य करीत असतानाही या दाभाडी अर्थात देववाडीच्या भुमीत अवैध सट्टा मटका माफीया बापू मोरे मात्र आपले बस्तान बसवून गाव व परिसरात युवा पिढी वाममार्गाला लावण्याचे घोर महाभयानक कृत्य करीत आहे.त्याबाबत खेदाची बाब अशी की,या गावातील कोणत्याही राजकीय प्रस्थापिंतानी किंवा तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी लक्ष न दिल्यामुळे त्याशिवाय पत्रकारिता क्षेत्रातून या गावाचे नाव सतत गाजविणारे देखील का मागे पडलेत हा देखील न उलगडणारा प्रश्नच आहे.वास्तविक बापू मोरेंच्या या अवैध सट्टा मटका जुगारामुळे युवा पिढी उध्वस्त होण्याबरोबरच गोरगरीब मायमाऊलींच्या संसाराची वाताहात होत चाललेली आहे.तर दुसरीकडे शेतकऱ्यांना शेतकामासाठी शेतमजूर मिळणेही दुरापास्त होत चालल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.पोलिस प्रशासनाचे प्रथम नैतिक कर्तव्य असते ते म्हणजे आपल्या हद्दीतील अवैध धंदे समूळ नष्ट करण्याचे!मात्र येथेही नेमके छावणी पोलिस स्टेशनचे अधिकारी नेमके का अपूरे पडत आहेत की,अद्याप पर्यत दाभाडीतल्या या सट्टा माफीयांचा अड्डा नेस्तनाबूत करु शकले नाहीत,की पोलिस प्रशासनावरही कुणाचा राजकीय वरदहस्त आहे.त्यामुळे कारवाई करण्यास धजावत नाहीत असाही विषय आता सर्रासपणे तालुक्यात चर्चिला जात आहे.                                                  ना.भुसे साहेब थोडं इकडेही लक्ष द्या! गोरगरीबांचा आशिर्वाद मिळेल!!                             मा.ना.दादाभाऊ भुसे यांनी यापूर्वी केलेल्या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक होत असले,तरी ज्याप्रमाणे झोडगे,पाटणे,चाळीसगाव फाटा,वडनेर या ठिकाणी धडक कारवाई करुन ही गावे जुगारमुक्त केलीत,अगदी त्याचप्रमाणे दाभाडीतील सट्टा माफीया बापू मोरे,सुजन थियटरजवळील अशोक वाणी,कँम्पातल्या शनि मंदीराजवळील बंडू यांचेही अड्डे उध्वस्त करुन संपूर्ण तालुकाच जुगारमुक्त केला तर निश्चितच गोरगरीब मायमाऊलीचे आशिर्वाद लाभतील व युवा पिढी उध्वस्त होण्यापासून वाचेल.