आशाताई बच्छाव
इंदिरानगर येथे तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा…
माजी उपाध्यक्ष अनिलजी कुनघाडकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले..
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):दरवर्षी प्रमाणे याही वर्षी इंदिरानगर येथे तान्हापोळ्याचे आयोजन करण्यात आले.
कोरोना या महामारी मुळे सतत दोन वर्षे हा उत्सव हऊ शकला नाही पंरतु या वर्षी इंदिरानगर हणुमान मंदिर येथे मोठ्या प्रमाणामध्ये तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बालगोपालांनी आपले नंदीबैल आकर्षक रित्या सजवुन व वेशभूषा करुन…….आणले यावेळी नंदिबैलांची विधिवत पुजन अनिलजी कुनघाडकर यांनी केली.
तान्हापोळ्यामध्ये नंदिबैल सजावट व वेशभूषा या दोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नंदिबैल व वेशभूषा स्पर्धेचे निरीक्षण अनिलजी कुनघाडकर यांनी केले नंदिबैल सजावट स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्रमांक आलेल्या बालगोपालांना पारितोषिक देण्यात आले.
यावेळी राकेश नैताम,कैलास भांडेकर,राजु बौबाटे,प्रविन नैताम, मयुर कुनघाडकर, सुरज बडवाईक,गुरुदेव भुरसे,देवानंद खोब्रागडे, राहुल गिरसावले, सोनू नैताम,संतोष भोयर, संजय भुरसे , श्रीराम सेना, गणेश मंडळ व नव दुर्गा उत्सव मंडळ इंदिरानगर येथिल नागरिक उपस्थित होते.






