आशाताई बच्छाव
स्वर्णमेघ प्रॉडकशन्स ” घेऊन आले बहारदार , पाय थिरकायला लावणारे गीत ” आला माझा देव आला”. रत्नागिरी,(सुनिल धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गणपती बाप्पा च्या आगमनाला काही दिवस राहिलेले असताना गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी आपल्या समोर ” स्वर्णमेघ प्रॉडकशन्स ” घेऊन आले आहे गणेश आगमनाचे एक बहारदार , पाय थिरकायला लावणारे गीत ” आला माझा देव आला”.
सुरेल चाल, उत्तम वाद्यवृंद् , आणि ढोल ताश्याचा जबरदस्त मेळ अशी या गीताची वैशिष्ठ्ये असून या गीताचे गीतकार आणि सांगीतबद्ध केले आहे रत्नागिरी चे होतकरू कलाकार श्री. प्रसाद शेवडे यांनी. रत्नागिरी चे उमदे संगीत संयोजक आणि हरहुन्नरी कलाकार् श्री. पंकज घाणेकर यांनी या गीताचे संगीत संयोजन केले असून श्री. ओंकार पंडित श्री. नंदकुमार उर्फ नंदू जुवेकर श्री. ओंकार कोळेकर आणि श्री. अखिल माने यांनी या गीताचे डायरेक्शन आणि व्हिडिओग्राफी चा मानाचा विडा उचलला आहे . गीताचे गायक श्री. विनायक महाजन आणि श्री. अमेय गुरव आणि गायक वृंद आहेत.
हे गीत दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी YouTube ला प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांचा वाढता उत्साह आणि मिळत असलेले व्हियूज आणि लाईकस प्रसाद शेवडे यांच्या ” स्वर्णमेघ प्रॉडक्शन् चा उत्साह वाढवत आहे. आपण सर्व रत्नागिरीकरांना विनम्र आवाहन करण्यात येते की आपण ही या गीताला youtube वर पहावे आणि आपले subscriber रुपी आशीर्वाद आम्हा पाठीशी असावेत.
youtube लिंक #ala maza dev ala#
7058140502.






