आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय
एसटीच्या दोन गाड्यांची दापोलीमध्ये समोरासमोर धडक, सोळा जण जखमी दोन्ही बसचेही नुकसान
रत्नागिरी – सुनिल धावडे रत्नागिरी जिल्हा ब्युरो चिफ युवा मराठा न्युज नेटवर्क
- दापोली येथे आज सकाळी आठ वाजता दोन एसटी ची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात सोळा जण जखमी झाले आहेत.
बोरीवली दापोली व दापोली मुरादपूर या दोन गाड्यांची धडक झाली यामध्ये अंदाजे सोळा जण जखमी झाले असून त्यामध्ये कॉलेज व शाळकरी मुलांचा जास्त समावेश होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.