आशाताई बच्छाव
रामपेठ अंगणवाडीत दहीहंडी साजरी रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
रामपेठ अंगणवाडीमध्ये, बालगोपाल दहिहंडी कार्यक्रम साजरा झाला. या कार्यक्रमासाठी संगमेश्वर गावचे उपसरपंच श्री विवेक शेरे ग्रामविकास अधिकारी श्री संजय शेलार, ग्रां पं.सदस्य प्रतिक्षा शेरे, मानसी अंब्रे, ग्रा. सं. अध्यक्ष सौ.प्रिया सावंत, शाळा व्यवस्थापन कमिटी सं नं. 2 सदस्य सौ. मयूरी रहाटे – श्री कुणाल शेट्ये, सामाजिक कार्यकते श्री दिनेश अंब्रे तसेच पालक, ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते. प्रथम सर्व मान्यवरांचे अंगणवाडीच्यावतीने स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी ग्रा.वि. अधिकारी शेलार यांनी मुलांना लाडू वाटप केले. तसेच पालक प्रतिभा चिचकर यांनी मुलांना जिलेबी वाटप केले, तर बाळकृष्ण कुसाळकर यांनी मुलांना फळवाटप केले.
अंगणवाडीतील काही विद्यार्थी राधा तसेच श्रीकृष्ण, गोविंदा यांची वेशभूषा करून मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात कार्यक्रमात सहभागी झाले होते. तसेच यावेळी अंगणवाडीत महिलांसाठी कार्यक्रम झिम्मा, फुगडी, दांडिया असे खेळून मोठया उत्साहाने दहीहंडी साजरी करण्यात आली. शेवटी अंगणवाडी सेविका. सौ. पल्लवी सचिन शेरे तसेच मदतनीस सौ. शितल दिनेश अंब्रे यांनी आभार मानले.