Home महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृद्धाश्रमात खाऊ वाटप.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृद्धाश्रमात खाऊ वाटप.

104
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220821-WA0045.jpg

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ, सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने नुकताच गोविंद वृद्धाश्रमात खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ खंडागळे, आरपीआय आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जयवंत पोळ शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्राध्यापक रामलिंग सावळजकर, भाजपा सरचिटणीस प्रकाश चोपडे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे माळशिरस तालुका अध्यक्ष शशिकांत कडबाने, सोलापूर जिल्हा पोलीस मित्रच्या अध्यक्षा विजया कर्णवर, जनसंपर्क अधिकारी माया कदम, समाजसेवक अनिल आवारे, राजू जगताप, रोहित कुंभार प्राध्यापक विनायकराव भगत, प्रा.ओंकार जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गोविंद वृद्धाश्रमाचे प्रमुख दशरथ मोतीराम देशमुख यांचा वृद्धाश्रमासाठी करीत असलेल्या योगदानाबद्दल तर भाजपा सरचिटणीस प्रकाश चोपडे यांचा वाढदिवसानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी दशरथ देशमुख यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ वृद्धाश्रमास नेहमीच विविध मार्गाने मदत करीत असतो, असे सांगत वृद्धाश्रम चालवताना येणाऱ्या अडचणी विशद करून सध्याची उपलब्ध जागा पुरत नसल्याने दोन-तीन खोल्या बांधण्याची गरज व्यक्त करून त्यासाठी मदतीचे आवाहन केले. तर प्रमुख अतिथी प्रा. साळवजकर व  जयवंत पोळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleअतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय. – कृषि मंत्री अब्दुल सत्तार
Next articleमुखेड तालुक्यातील अतिवृष्टीचे फेर सर्वेक्षण झालयाने शेतकऱ्यांचा फायदा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here