आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय
आमदार सुहास कांदे यांच्याकडून विठ्ठल रखुमाई मंदिराच्या मखरासाठी सव्वा किलो चांदी भेट
नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे
श्री संत सावता कंपाउंड नांदगाव येथील असलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरातील मखरासाठी आमदार सुहास ,कांदे यांनी मनोभावे सव्वा किलो चांदीची भेट उत्सव समिती पदाधिकारी व सदस्यांकडे सुपूर्त केली.
श्री संत शिरोमणी सावता महाराज उत्सव समिती तर्फे निरंतर सत्याचे आयोजन केले जाते यावर्षी समाप्तीच्या दिवशी आमदार सुहास कांदे यांना आरतीचा मान दिला गेला होता याप्रसंगी महिलांमधील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या मखरीसाठी चांदी दान देण्याची चर्चा त्यांनी ऐकली व याबाबत विचारणा केली असता सव्वा किलो चांदी देण्याची मनोगत व्यक्त केले होते या नुसार आज उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना निवासस्थानी आमंत्रित करून सव्वा किलो चांदी चे दान देण्यात आले.
आमदार सुहास कांदे यांची निरंतर धार्मिक कार्यक्रमातील रुची सर्वश्रुत आहे.याचेच हे एक उत्तम उदाहरण.
श्री संत सावता महाराज उत्सव समिती सदस्यांनी या वेळी आमदारांचे आभार व्यक्त केले.
या वेळी मंदिर हेच माझे घर हाच संकल्प करुन आवो रात्र मंदिर रा साठी योगदान देणारे राजाभाऊ मोरे, यांचे सहकारी, विष्णु,निकम, दत्ता मोरे देवमन टिळेकर, गोपाळ भस्मे, राहुल खैरनार, सोमासे प्रशांत खैरनार, भगीरथ जेजूरकर, कारभारी शिंदे, रामभाऊ सोर, सतीश, पैठणकर तात्या,केलास गायकवाड़ गायकवाड,बाऴासाहेब,मोकऴ, तसेच
संत शिरोमणी श्री सावता महाराज उत्सव समिती सदस्य उपस्थित होते.