आशाताई बच्छाव
गडगा ते कहाळा रोडवर मोकासदरा शिवारात मोटरसायकलचा आपघात एक अत्यवस्थ तर दोन गंभीर जखमी
===================
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
कहाळा येथून नावंदीकडे जाणाऱ्या ट्रिपल सीट युवकांच्या मोटारसायकलचा गडगा ते कहाळा रस्त्यावर मोकासदरा शिवारात अपघात एक जण अत्यवस्थ तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १९ ऑगस्ट रोजी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. अपघातातील जखमीना पुढील उपचारासाठी नायगाव रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नांदेड येथे पाठवण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात आले.
नायगाव तालुक्यातील नावंदी येथील तीन युवक मोटार सायकलने कहाळा ते गडगा मार्गे नावंदी कडे जात असताना सायंकाळी चार वाजताच्या सुमारास कहाळा-गळगा रोडवरील मोकसदरा या गावाजवळ भरधाव वेगातील मोटरसायकल क्र.एम एच २६- ६८२३ ही स्लीप झाली व हा अपघात झाला. यात संतोष विठ्ठल मुदगले वय वर्ष ३० वर्षे, विकास मोहन इंगळे वय २६ वर्ष ,उत्तम गोविंद बेद्रे वय २०वर्षे, हे तीनजन जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती नायगाव पोलिसांना समजताच नायगाव पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आनंदराव वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना पुढील उपचारासाठी नायगाव येथील ग्रामीण रुग्णालय पाठवले.
मात्र या अपघातातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे तर दोन जण गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात आली.






