आशाताई बच्छाव
भाजपा शिंदे सरकार येताच जिंतूर मतदारसंघांमध्ये ५० कोटी रस्ता कामास मंजुरी-आ.मेघना साकोरे बोर्डीकर
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)
(परभणी)जिंतूर:- राज्यामध्ये भाजप शिंदे सरकार येताच राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने व आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी जिंतूर मतदार संघातील रस्त्यांची झालेली अवस्था लक्षात आणून देता क्षणी ऑगस्ट २०२२ या पावसाळी पुरवणी अधिवेशनामध्ये खालील दर्शविलेल्या तब्बल ५० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामास मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
उर्वरित दोन वर्षांमध्ये देखील मतदार संघातील प्रत्येक रस्ता प्रत्येक गाव डांबरीकरणाने जोडल्या
जाईल आणि एकही रस्ता आणि एकही गाव डांबरीकरना च्या कामाव्यतिरिक्त शिल्लक राहणार नाही आणि मतदार संघातील सर्व रस्त्यांची कामे करण्यात येतील असा विश्वास या निमित्ताने त्यांनी व्यक्त केला आहे. राज्य मार्ग २४८ शेवडी भोशी कुन्हाडी दहेगाव वझर रस्ता २० कोटी रुपये. मोळा नवहाती तांडा वाघी धानोरा हंडी रस्ता. १५ कोटी रुपये. चारठाणा पाटी कुराडी करंजी बामणी रस्ता. ८ कोटी रुपये.मोरेगाव हातनुर वालूर कौसडी बोरी वसा रस्ता ७ सात कोटी रुपये असा निधी देण्यात आला आहे.