Home नांदेड नांदेड शहरातील कृष्णूर बंधारा पुन्हा फुटला

नांदेड शहरातील कृष्णूर बंधारा पुन्हा फुटला

295

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0002.jpg

पुणे ,हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: नांदेड शहरातील कृष्णूर बंधारा पुन्हा फुटला! नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर बंधारा पुन्हा फुटला तेथील अधिकाऱ्याने याच्या पाठीमागचे कारण असे सांगितले की कृष्णूर बंधारा, खेकडा व साळींदर याने फोडला .पहिल्यांदा बंधारा बांधल्यानंतर तो फुटला त्याची कारण असे सांगितले की खेकड्याने या बंधाऱ्याला पोखरून पोखरून फोडले. त्यानंतर चार वर्षांनी याला पुन्हा निधी मिळाला आणि तो बंधारा बांधण्यात आला. पुन्हा हा बंधारा फुटला नंतर कारण देण्यात आले साळींदर या प्राण्याने हा बांधणारा फोडला. खरे पाहिले तर यांच्या निकृष्ट कामाची खापर या प्राण्यांवरती फोडले जात आहे .कृष्णूर बंधारा हा पाजर तलाव या प्राण्यांना फोडला असं या अधिकाऱ्यांमार्फत सांगितले निकृष्ट कामाचा दर्जा याच्यावरती पडदा टाकण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जातोय. सरकारचे पैसे निव्वळ वाया जात आहेत याचा या ठिकाणी निदर्शनास येत आहे .तेथील नागरिकांनी असे सांगितले की खेकडा व साळींदर हे तलाव फोडू शकत नाहीत या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये पैसे खाऊन हा तलाव कामामध्ये तडजोड करून बांधण्यात आला आहे. त्यामुळे वारंवार बांधूनही हा तलाव फुटतोय. कारण हे सर्व भ्रष्ट अधिकारी यांच्यावरती कठोर व्हायला पाहिजे व हा तलाव पुन्हा चांगल्या पद्धतीने बांधण्यात आला पाहिजे. कारण त्याच्यावरती पूर्ण गाव व आसपासच्या वाड्या अवलंबून आहेत. याची चौकशी व्हायला पाहिजे असे या नागरिकांचे म्हणणे आहे.

Previous articleगडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचे संशोधन करण्याची आवश्यकता
Next articleअफगाणिस्तानच्या काबूली शहरात मस्जीदमध्ये भीषण स्फोट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.