Home रत्नागिरी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बसणी येथे विविध कार्यक्रम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बसणी येथे विविध कार्यक्रम

127

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0060.jpg

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बसणी येथे विविध कार्यक्रम

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : तालुक्यातील बसणी ग्रामपंचायत येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहण करून प्रभातफेरी काढण्यात आली. यात सरपंच सौ. साक्षी झगडे, उपसरपंच किशोर नेवरेकर, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ सहभागी झाले. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सुदृढ बालक स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व, निबंध, पाककला, रांगोळी आणि समूहगीत या स्पर्धा आयोजित केल्या. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. विविध स्पर्धांतील विजेत्यांसह बीडीसी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी, इयत्ता दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले. बसणीतील दीपक कदम यांचा एलएलबी झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचेही आभार मानण्यात आले.

Previous articleरत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून अमित विलणकर यांचा सत्कार
Next articleचरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात सामुहिक राष्ट्रगीत गायन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.