Home रत्नागिरी जिंदल विद्यामंदिर प्रशालेत आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

जिंदल विद्यामंदिर प्रशालेत आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

141

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0046.jpg

जिंदल विद्यामंदिर प्रशालेत आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम                            रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदल विद्यामंदिर प्रशालेत स्काऊट गाईड व कब बुलबुल या युनिट मार्फत रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कलेकर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेतील विदयार्थ्यांनी स्वतः च्या कलाकृतीतून राख्या बनविल्या. त्या राख्या समुदाय मदतनीस यांना देण्यात आल्या. यांमध्ये ईयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
त्यानंतर रॅली काढण्यात आली.

यामध्ये महापुरुषांच्या वेशभूषा करण्यात आल्या. यावेळी जिंदल शाळा ते टाऊनशिप अशी रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता सहावी ते अकरावी पर्यंत विध्यार्थी सहभागी झाले. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापिका सौ. तृप्ती वराठें यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्याचं बरोबर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पेद्दना यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Previous article75 वा स्वातंत्र्यदिन चाफे नं 1 शाळेत उत्साहात संपन्न
Next articleदेगलूर महाविद्यालयात समूह राष्ट्रगीत गायन संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.