Home बुलढाणा कोद्री येथील नागरिकांचेआमरण उपोषण लेखी आश्वासना नंतर मागे! अखेर उपोषणामुळे जागे झाले...

कोद्री येथील नागरिकांचेआमरण उपोषण लेखी आश्वासना नंतर मागे! अखेर उपोषणामुळे जागे झाले प्रशासन.

165

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0037.jpg

कोद्री येथील नागरिकांचेआमरण उपोषण लेखी आश्वासना नंतर मागे! अखेर उपोषणामुळे जागे झाले प्रशासन.

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर चे गटविकास अधिकारी संजय पाटील व चार ग्रामसेवक यांनी केलेल्या ओल्या पार्टी प्रकरणी व्हायरल व्हिडिओ नंतर आणि ग्रामपंचायत कोद्री येथील घरकुल प्रपत्र (ड) यादीतील घोळ व गरजू लाभार्थ्यांच्या नावापुढे चुकीचे निकष दाखवून पात्र लाभार्थ्यांना अपात्र दाखविल्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई व घरकुल यादीतून वगळण्यात आलेल्या गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळणे बाबत ग्राम कोद्री येथील श्रीराम पाटील खोंड यांनी लेखी तक्रार देऊन सुद्धा जिल्हा परिषद कडून संबंधितांवर कारवाई न करता पाठीशी घालण्यात येत असल्याचे दिसून आले. बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुका हा अतिदुर्गम व मागासलेला तालुका म्हणून याकडे जिल्हा पातळीवर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संग्रामपूर तालुक्यावर दुर्लक्ष असल्याच्या अनेक घटना या तालुक्यांत पहावयास मिळत आहेत. म्हणून संग्रामपूर तालुक्यातील अशा अधिकारांविरुद्ध लोकशाही मार्गाने न्याय व हक्कासाठी अखेर दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ग्राम कोद्री येथील नागरिकांनी जिल्हा परिषद बुलढाणा येथे एक तासाचे लाक्षणिक उपोषण करून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा समोर भर पावसात सकाळी अकरा वाजता पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली यावेळी जिल्हा परिषद कडून उपोषण सोडण्याबाबत उपोषण करत्यांना कुठलेही लेखी आश्वासन न देता सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु उपोषण करते हे त्यांच्या मागणीवर ठाम असल्यामुळे अखेर प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन उपोषणकर्त्यांच्या मागणी प्रमाणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं) जिल्हा परिषद बुलढाणा लोखंडे यांच्याकडून स्वतः उपोषण मंडपाला भेट दिली व लेखी आश्वासन देऊन आणि येत्या दहा दिवसात घरकुल संबंधी विशेष सुनावणी घेऊन सर्व उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर तात्काळ निर्णय घेण्यात येईल असे सुद्धा उपोषण करत्यांन सोबत चर्चा करतेवेळी शब्द दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी उपोषण करते कोद्री येथील जेष्ठ नागरिक श्रीराम खोंड, निवृत्ती खोंड, भास्कर खोंड, गजानन खोंड, मारूती साबळे,नितीन शिंदे. यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले . असून लेखी आश्वासनाप्रमाणे पुढील कार्यवाही न झाल्यास वेळप्रसंगी यापेक्षाही मोठ्या स्वरूपात आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी श्रीराम पाटील खोंड यांनी दिला. त्यामुळे आता बिडिओ संग्रामपूर व चार ग्रामसेवक व इतर मूलभूत सुविधे बाबत काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2022 जि. प. शाळा भौरी दहिवड येथे उत्साहात साजरा.
Next articleवरवट बकाल येथील शेख निसार मिस्त्री कामासाठी जातो सांगुन परतलाच नाही नातेवाईक चिंता ग्रस्त !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.