राजेंद्र पाटील राऊत
कोल्हापूरात तृतीयपंथीयाचा धिंगाणा,पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष की कानाडोळा..?
_____________________
राहुल शिंदे
ब्युरो चीफ युवा मराठा
_____________________
संपूर्ण राज्यासह कोल्हापूर जिल्हा देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव तसेच श्रावणी सोमवार साजरा करत असताना कोल्हापूर शहरात एक लाजिरवाणी गोष्ट घडली आहे.शुक्रवार पेठेतील एका तालीम मंडळाच्या कार्यक्रमात भर दिवसा डाँल्बीच्या ठेक्यावर तृतीयपंथी नाचत असलेला व्हिडीओ समोर आला आहे.सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय.त्यामुळे सर्व स्तरावरुन पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.दरवर्षी तिसऱ्या श्रावण सोमवारी शुक्रवार पेठेत देवीचे जग आणण्याची प्रथा आहे.काल दुपारी हा धार्मिक कार्यक्रम होता.या कार्यक्रम मध्ये डाँल्बीच्या ठेक्यात तृतीयपंथी नृत्य करत होते.विशेष म्हणजे हातात सिगारेट घेऊन धुम्रपान करत डाँल्बीच्या आवाजात हा सारा धिंगाणा सुरु होता.या मध्ये हजारो लोक सहभागी झाल्याचेही या व्हिडीओ मध्ये दिसून आले.त्यामुळे १५ आँगस्ट दिवशी शाहू महाराजांच्या कोल्हापूर मध्ये धार्मिक कार्यक्रमात असा सारा धिंगाणा सुरु असताना पोलिस प्रशासन काय करत होते?पोलिसांना याची कल्पना नव्हती का? की तिकडे पोलिसांनी जाणून बुजून दुर्लक्ष केले असा प्रश्न सर्वसामान्य मधून उपस्थित केला जात आहे.






