Home गडचिरोली पुढील तीन दिवस गुंजणार चामोर्शीत देशभक्तीपर गीत आमदार डॉक्टर देवरावजी होळी

पुढील तीन दिवस गुंजणार चामोर्शीत देशभक्तीपर गीत आमदार डॉक्टर देवरावजी होळी

132

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0042.jpg

पुढील तीन दिवस गुंजणार चामोर्शीत देशभक्तीपर गीत

आमदार डॉक्टर देवरावजी होळी                             गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

चामोर्शी पोलीस स्टेशन व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयातर्फे सेल्फी पॉईंट व देशभक्तीपर गीतांचा संयुक्त उपक्रम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या जनसंपर्क कार्यालय व चामोर्शी पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने हत्ती गेट जवळ सेल्फी पॉईंट व देशभक्तीपर गीताच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी चामोर्शीचे पोलीस निरीक्षक शेवाळे साहेब, भाजपा तालुका महामंत्री साईनाथ जी बुरांडे ज्येष्ठ नेते जय रामजी चलाख, यांचे सह चामोर्शी पोलीस स्टेशनचे अधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यालयामध्ये पुढील ३ दिवस सातत्याने देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचा धुमधडाका सुरू राहणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली. तसेच हत्ती गेट जवळील या सेल्फी पॉईंटच्या चामोर्शी वासीयांनी लाभ घेऊन स्वतःचे सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकून घरघर तिरंगा अभियानाचा प्रसार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Previous articleकत्तलीसाठी नेणार्या 52 जनावराची मुक्तता,आरोपीस अटक
Next articleविभाजन विभीषिका स्मृती दिवस गडचिरोली येथे साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.