Home गडचिरोली आमदार आदर्श ग्राम पेंढरी येथे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे हस्ते...

आमदार आदर्श ग्राम पेंढरी येथे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

149

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0056.jpg

आमदार आदर्श ग्राम पेंढरी येथे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण    गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

कृषी गोडाऊन ,प्रवासी निवारा यांचे लोकार्पण तर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन

अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील पेंढरी गावाचा आमदार आदर्श गाव संकल्पनेतून विकास झाल्याचा आनंद

आझादीच्या अमृत महोत्सवा प्रसंगी ग्रामपंचायत परिसरामध्ये ७५ वृक्ष लागवडीच्या संकल्पनेतून केले वृक्षारोपण

आमदार आदर्श गाव संकल्पनेतील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील पेंढरी गावाचा झालेला विकास या लोकार्पण सोहळा निमित्त झालेल्या विकास कामातून दिसून येत असल्याने त्याचा आपल्याला आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पेंढरी येथील कृषी गोडाऊन व प्रवासी निवाऱ्याच्या लोकार्पण प्रसंगी केले

यावेळी पेंढरीचे सरपंच पवन जी येरमे , जिल्हा परिषदेचे उप विभागीय अभियंता फटिंगजी, कृषी विभागाचे अधिकारी, गडचिरोली भाजपा तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, ग्रामपंचायतीचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते

यावेळी ग्रामपंचायत परिसरामध्ये आझादीच्या अमृत महोत्सवा प्रसंगी ७५ वृक्ष लागवडीच्या संकल्पनेतून आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी अतिदुर्ग नक्षलग्रस्त असलेले पेंढरी ह्या गावाची आपल्या आमदार आदर्श गाव संकल्पनेतून निवड केली. त्यावेळी त्यांच्यावर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली. आपण एवढ्या दूर असणाऱ्या गावाची निवड केली मात्र या गावात आपण काहीही करू शकणार नाही. कारण आपल्याला त्या भागात जाता येणार नाही . मात्र आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पेंढरी सारख्या दुर्गम असलेल्या भागांमध्ये अनेकदा भेटी देऊन परिसरात वारंवार संपर्क करीत त्या गावांमध्ये आतापर्यंत त्यांनी विविध विकास कामे केली.

कृषी गोडाऊन चे बांधकाम झाल्याने आता या परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या कृषी मालाची साठवणूक त्या गोडाऊन मध्ये करता येईल त्याचा मोठा लाभ या परिसरातील शेतकऱ्यांना झाल्याचा आनंदही त्यावेळी यांनी व्यक्त केला . तसेच ये जा करणाऱ्या प्रवाशांना प्रवासी निवाराच्या माध्यमातून थांबण्यासाठी निश्चित अशी जागा सुद्धा मिळाली त्याचाही आपल्याला आनंद झाल्याचे या निवाऱ्याच्या लोकार्पण प्रसंगी त्यांनी केले

Previous articleभारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मुक मिरवणूक/यात्रा
Next articleकत्तलीसाठी नेणार्या 52 जनावराची मुक्तता,आरोपीस अटक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.