आशाताई बच्छाव
पुणे ,हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: संपूर्ण देशामध्ये हर घर तिरंगा, घर घर तिरंगा हा देशाचा ७५ वा अमृत महोत्सव संपूर्ण देशामध्ये उत्साहात साजरा होतोय! संपूर्ण देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरघर तिरंगा हर घर तिरंगा हे जे मोहीम राबवली गेली त्या मोहिमेला देशांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्यामध्ये दिल्ली सरकारी वास्तूंना तिरंगी रोशनाई करून सजवण्यात आली आहे. दिल्लीमध्ये अमित शहा यांनी आपल्या निवासस्थानी तिरंगा लावून या मोहिमेत सहभाग घेतला. नागपूरच्या तिरंगा रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहभाग घेऊन खूप मोठ्या प्रमाणात रॅलीचे नियोजन केलं .त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग पाहायला मिळतोय, मुंबई मध्ये सरकारी इमारतींना तिरंगी आकर्षक रंगाची रोषणाई पाहायला मिळाली. वाराणसी मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शाळकरी मुलांबरोबर रॅली काढून या उत्साहात सहभागी झाले. संभाजीनगर मध्ये ही मोहीम खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात पार पडताना दिसते. रायगड मध्ये अलिबाग या ठिकाणी तिरंगा घेऊन खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी हाती घेतली. पुणे,पिंपरी येथे लेझर शोच्या माध्यमातून तिरंगा गौरवाच्या गाण्यावर अमृत महोत्सव साजरा होतोय. उजनी धरणाला सुद्धा तिरंगा रोषणाईने सजवले आहे .पनवेलच्या शाळेत मुलांची रॅली निघून त्यात तिरंगा झेंडे हातात घेऊन अमृत महोत्सवामध्ये सहभाग दाखवला. सोलापूर जिल्ह्यात १५० फुटाचा भारताचा नकाशा विद्यार्थ्यांनी झेंडे हातात घेऊन नकाशा तयार केला आहे .त्यामध्ये प्रत्येकाच्या हातात झेंडा दिसतोय. धुळ्यात हेरिटेज वोक चे नियोजन करण्यात आले. या सर्व प्रकाराच्या माध्यमातून भारत देशामध्ये या योजनेचा पुरेपूर आनंद घेताना नागरिक दिसत आहेत व देशाचा 75 वा अमृत महोत्सव खूप छान पद्धतीने साजरा करण्यात येतोय हे या ठिकाणी पोस्ट दिसते.