Home नांदेड भाजपाच्या तिरंगा रॅलीस नायगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद…

भाजपाच्या तिरंगा रॅलीस नायगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद…

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0030.jpg

◆भाजपाच्या तिरंगा रॅलीस नायगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद…
खा.चिखलीकर आ. रातोळीकर यांचे उपस्थितीत व होटाळकर,बच्चेवार,भिलवंडे यांच्या पुढाकारातून दोन हजार मोटारसायकल स्वारांसह 5 हजार विद्यार्थ्यांचा रॅलीत भव्य दिव्य तिरंगा रॅली.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आजादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत नायगाव येथे नांदेड जिल्ह्याचे खा.प्रताप बसतील चिखलीकर आ. राम पाटील रातोळीकर यांच्या उपस्थितीत 5000 तिरंगा वाटप व दोन हजार मोटारसायकल स्वारांसह व 5 हजार देशभक्त विद्यार्थी आणि भारतीय नागरिक यांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून १२ आगस्ट रोजी नायगाव शहर व तालुक्यात भव्य दिव्य रैली भाजपच्या वतीने काढण्यात आली होती.

भारतीय स्वातंत्र प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण झाल्या बद्दल देशभरात आझादी का अमृत महोत्सव अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टी नायगाव जिल्हा नांदेड च्या वतीने हर घर तिरंगा अभियान दिनांक 12 ऑगस्ट रोज शुक्रवार या दिवशी नायगाव शहरातील होटाळकर यांच्या मिलिनीयम पब्लिक स्कुल च्या भव्य पटांगणावर 5000 तिरंगा ध्वजाचे उपस्थितांना वाटप करन शाळेतीळ विद्यार्थी यांनी 75 वर्ष स्वातंत्र्याचे हे मानवी साखळीच्या आकड्यातून चित्र उभारून प्रशंसनीय प्रदर्शन केले. नायगाव शहर व तालुक्यात भव्य दिव्य दोन हजार मोटरसायकलची व 5 हजार देशभक्त विद्यार्थी यांची भव्य दिव्य तिरंगा रॅली लक्ष विधी एक आगळेवेगळे आकर्षण ठरली.
या रॅलीमध्ये संबंध तालुक्यातुन स्वस्फुर्त पणे नागरिक कार्यकर्ते यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर श्री. दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा तालुका नायगाव संस्थेतील सर्व प्राथमिक माध्यमिक, ज्युनिअर कॉलेज, जवळपास 5000 विद्यार्थी तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (लोकसभा सदस्य नांदेड) मा. आमदार राम पाटील रातोळीकर (विधान परिषद सदस्य) मा. गंगाधर जोशी (महामंत्री भाजप नांदेड) ,मा. व्यंकटराव पाटील गोजेगांवकर (भाजपा जिल्हा अध्यक्ष नांदेड ),मा. किशोर देशमुख (युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाजपा नांदेड) शिवराज पाटील होटाळकर (माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड तथा जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड) मा.राजेश कुंटूरकर (अध्यक्ष कुंटूर शुगर ऍग्रो लिमिटेड) भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार मा.श्रावण पाटील भिलवंडे (जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड) मा. लक्ष्मणराव ठक्करवाड( जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड ), ,मा.माणिकराव लोहगाव (माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड) ,दिलीपराव धर्माधिकारी, मा.गजानन शिंदे (तहसीलदार नायगाव) मा.अभिषेक शिंदे (पोलीस निरीक्षक नायगाव) ,शंकर पाटील कल्याण (शहराध्यक्ष भाजपा नायगाव), भगवानराव लंगडापुरे, गजानन चव्हाण, संजय पाटील इज्जतगावकर, मोहनराव पाटील भिलवंडे, साईनाथ अक्कमवाड, आनंद बावने,संजय मोरे,रावसाब मोरे,सुरेश कदम ,राजेंद्र रेड्डी, नागराव पाटील शेळगावकर, व्यंकट कोकणे, कैलास भालेराव, शंकर वडपत्रे, सुरेश पाटील खांडगावकर, शिवा पाटील गडगेकर, दत्तू पाटील होटाळकर, शिवाजी पाटील सावरखेड, शिवाजी पाटील होटाळकर, प्रदीप देमेवार,महेश शिंदे, भाऊराव पाटील पवार, मनोहर पाटील हिवराळे, राम खनपटे, विलास पाटील धुपेकर, भगवान भद्रे, संजय बन, जुने पठाण, श्रीराम पवार, महेश पाटील पवार, चंद्रकांत पवार,व सर्व नायगाव तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
या भव्य रॅलीचे मुख्यआयोजक: शिवराज पाटील होटाळकर (भाजपा जिल्हा सरचिटणीस नांदेड तथा माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड) यांनी केलेले सुरेख नियोजन व रॅलीतील देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम,घोषणा,नरसी, नायगाव,होटाळा,गडगा,मांजरम , कोलंबी आदी ठिकाणच्या ग्रामस्थांनी केलेल भव्य स्वागत यामुळे रॅलीत व कार्यक्रमात देशभक्तीचे वातावरण संपूर्ण तालुक्यात निर्माण झाले.कोलंबी येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

Previous articleजिल्हाधिकारी नांदेड द्वारा आयोजित” फ्रीडम जाॅईन रॅली” लक्षवेधी
Next articleदेशात आज “हर घर तिरंगा घर घर तिरंगा” अमृतमहोत्सव होतोय उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here