Home गडचिरोली व्यावसायिक पायलट प्रशिक्षणासाठी गडचिरोलीच्या विनय भांडेकर ची निवड

व्यावसायिक पायलट प्रशिक्षणासाठी गडचिरोलीच्या विनय भांडेकर ची निवड

124

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0089.jpg

व्यावसायिक पायलट प्रशिक्षणासाठी गडचिरोलीच्या विनय भांडेकर ची निवड                                       गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील एकूण वीस विद्यार्थ्यांना नागपूर फ्लाईंग क्लब नागपूर या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत मोफत व्यावसायिक पायलट प्रशिक्षण (कमर्शियल पायलट लायसन्स CPL) दिले जाण्याची योजना आहे. यावर्षी या प्रशिक्षणाच्या निव डीसाठी 12 जुलै रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती त्यामधून 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून यात गडचिरोलीच्या विनय अनिल भांडेकर या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
20 विद्यार्थ्यांमध्ये इतर मागासवर्गांमधून 12, भटक्या जाती व विमुक्त जाती मधून 7 आणि विशेष मागास प्रवर्गातून 1 असे एकूण 20 विद्यार्थी निवडले गेले असून यात 50% (10 जागा) ग्रामीण भागातील उमेदवारासाठी राखीव आहेत.
व्यावसायिक पायलट प्रशिक्षणासाठी प्राप्त अर्जातून बारावीच्या गुणांकनुसार ( 1:30 या प्रमाणात ) 600 उमेदवारांना चाळणी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले. अंतिम निवडी साठी 150 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येऊन त्यामधून 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. असे निवड प्रक्रियेचे स्वरूप होते.

20 विद्यार्थ्यांमध्ये विनय भांडेकर (गडचिरोली), पुष्पराज पाटील (औरंगाबाद), वैष्णवी उराडे (ब्रह्मपुरी, चंद्रपूर), भक्ती पाटील (नाशिक), प्रणव सावरकर (काटोल, नागपूर), प्रसाद गाडेकर (राहुरी, अहमदनगर), भाग्याश भागवत (वाघोली, पुणे), आदित्य मेहेरे (वडेगाव, बाळापुर, अकोला), तेजस बडवार (लासलगाव, निफाड, नाशिक), जयेश देशमुख (अमळनेर, जळगाव), प्रणव खोत (कवठे महाकाल, सांगली), अविनाश येरणे (गोरेगाव, गोंदिया), लखन सिंग परदेशी (जामनेर रोड, भुसावळ, जळगाव) अंकिता लोखंडे( सोलापूर), अंकिता गोसावी (शिरपूर, धुळे), स्वप्नील चव्हाण (औरंगाबाद), सतीश गिरी (नांदेड), ऋतुंबरा देवकाते ( पिंपळी,बारामती, पुणे), रोशन मराठे (मुल, चंद्रपूर), भूषण जुमळे (अमरावती).

Previous articleराज्य सरकारने 13,600 ऐवजी किमान 35,000 ते 50,000 प्रतिहेकटर अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना द्यावी -वसंत सूगावे पाटील
Next articleधानोरा येथील तालुका क्रिडा संकुल लवकरच होणार आमदार डॉ देवरावजी होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.