Home रत्नागिरी विद्यार्थी, गतिमंद व मनोरुग्णांनी बनवल्या जवान, पोलीस व मुलांसाठी २६०० राख्या मुकुल...

विद्यार्थी, गतिमंद व मनोरुग्णांनी बनवल्या जवान, पोलीस व मुलांसाठी २६०० राख्या मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स कौशल्य विकास केंद्राचा पुढाकार

112

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0038.jpg

विद्यार्थी, गतिमंद व मनोरुग्णांनी बनवल्या जवान, पोलीस व मुलांसाठी २६०० राख्या मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स कौशल्य विकास केंद्राचा पुढाकार                                                           रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या अवीट नात्याला अधिक घट्ट करणारा सण आहे. याच नात्याची वीण अधिक घट्ट करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने २६०० राख्या सीमेवरील जवान, पोलीस कर्मचारी आणि विशेष मुलांसाठी पाठवण्यात आल्या. या राख्या फाउंडेशनच्या पुढाकारातून शाळा, महाविद्यालये आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्रात बनवण्यात आल्या.

रत्नागिरी (महाराष्ट्र) आणि मासार (गुजरात) येथील फिनोलेक्स कौशल्य विकास केंद्र, रत्नागिरीतील मुकुल माधव विद्यालय, विशेष मुलांचे कौशल्य विकास केंद्र, येरवडा येथील मनोरुग्णालयातील रुग्णांनी आणि थॅलेसेमियाग्रस्त तरुणांनी राख्या बनवण्याच्या उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रेम, काळजी आणि चांगल्या आरोग्यासाठी व सुरक्षेसाठी प्रार्थना करत या राख्या आपल्या सीमेवरील भावांना पाठवण्यात आल्या.

या राख्या रत्नागिरी येथील तटरक्षक दल, पोलीस कर्मचारी, सियाचिनमधील जवान, औंध लष्कर केंद्रातील जवान, अपंग सैनिक कल्याण केंद्रातील जवान, रत्नागिरीतील रिमांड होम, उत्तर आणि पश्चिम भारताच्या सीमेवरील जवान, राजस्थानच्या सीमेवरील जवानाना पाठवल्या आहेत. तसेच गुजरातच्या पद्रा गावातील शाळा आणि मुकुल माधव विद्यालय रत्नागिरी येथील विद्यार्थी राख्यांची देवाणघेवाण करणार आहेत.

मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “सीमेवर आपल्या संरक्षणासाठी तैनात भावांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी दरवर्षी फाउंडेशनकडून रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्या पाठवल्या जातात. प्रेम, काळजी आणि प्रार्थनेसह ही राखी पाठवली आहे. औंध लष्कर केंद्रात सेलेब्रल पाल्सीग्रस्त, गतिमंद, थॅलेसेमिया ग्रस्त, अनाथ मुली आणि मुकुल माधव फाउंडेशनमधील महिला कर्मचारी राखी बांधून रक्षा बंधन साजरा करणार आहेत.”

Previous articleपोलीस पथकाच्यावतीने देशभक्तीपर गीतांचे गायन सावर्डे विद्यालयात लक्षवेधी उपक्रम
Next articleन्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.