आशाताई बच्छाव
अभिजित हेगशेटये लिखीत इंग्रजी आवृत्ती बायोग्राफी ॲाफ हळबे मावशी हे किंडल आवृत्तीचे प्रकाशन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संपन्न रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
इंदिराबाई हळबे यांचे सेवाव्रतीं हळबे मावशी या अभिजित हेगशेटये लिखीत मराठी पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती बायोग्राफी ॲाफ हळबे मावशी हे किंडल आवृत्तीचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांच्या हस्ते देवरुख येथे झाले .
संगणक प्रकाशन यांनी हे इंग्रजी पुस्तक ई-बुक किंडल बुक फॅार्म मध्ये जगातील अत्यूच्च दर्जाच्या ॲमेझॅान प्लॅटफॉर्मवर प्रसिध्द केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील किंडल प्लॅटफॅार्मवर जागतिक बाजारपेठेत जाणारे हे पहिलेच पुस्तक मानले जात आहे. या पुर्वी सेवाव्रतीं हळबे मावशी हे राष्ट्रसेवादल प्रकाशित हळबे मावशी यांच्या पुस्तकाच्या दोन आवृत्ती संपल्या असून ॲाक्टोबर महिन्यात त्याची तिसरी आवृत्ती येणार आहे.
मावशी हळबे यांचा चाहता वर्ग जगाच्या अनेक भागात आहे. मावशी यांचे १९५४ पासून सामाजिक क्षेत्रातील अतूलनिय कार्य हे मदर तेरेसां इतकेच महत्वाचे आहे. त्या कोकणच्या मदर तेरेसा होत्या. त्यांचे महिला बालकल्याण , आरोग्य, ॲार्फनेज, युवक, शेती, पाणी या क्षेत्रातील कार्य पुढील अनेक पिढ्यांसमोरील आदर्श आहे. आजच्या तरुण पिढीला आणि जगातील लोकांना ते समजावे यासाठी त्याची इंग्रजी आवृत्ती काढण्याचा आग्रह जेष्ट भाषा तज्ञ पद्मश्री डॅा गणेश देवी यांनी केला आणि प्रशांत तळणीकर यांनी त्याचे भाषांतर केले , विश्वनाथ खंदारे यांनी त्याला थेट जगाच्या व्यासपीठावर नेले आणि आज ते जगातील १३ देशात वाचकांना उपलब्ध असल्याचे लेखक अभिजित हेगशेटये यांनी सांगितले.
सदर पुस्तक एकूण १३ देशातील ॲमेझॉन पेज वर हे ईबुक प्रकाशित झाले आहे. त्यात भारतासह US, UK, Australia, Canada, Japan, Brazil, New Zealand, Mexico, France, Germany, Italy, Spain या देशांचा समावेश आहे. अँमेझोन लिंक पुढील प्रमाणे
आहे. https://www.amazon.in/dp/B0B8DKGYG5