Home गडचिरोली राष्ट्रिय महामार्गावरील शिवनी नाल्यावरील पुलाची उंची वाढवा आमदार डॉ देवरावजी होळी

राष्ट्रिय महामार्गावरील शिवनी नाल्यावरील पुलाची उंची वाढवा आमदार डॉ देवरावजी होळी

155

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0041.jpg

राष्ट्रिय महामार्गावरील शिवनी नाल्यावरील पुलाची उंची वाढवा

आमदार डॉ देवरावजी होळी

नव्यानेच बांधलेल्या गोविंदपुर येथील नाल्यामुळे वारंवार वाहतूक बंद होणे दुर्दैवी                            गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गोविंदपुर नाल्यावरील पुलाची देखील उंची वाढवणे आवश्यक

विद्यमान परिस्थिती लक्षात घेता पुलाची उंची वाढविणे आवश्यक असतानाही राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष

नुकत्याच नव्याने बांधलेल्या गडचिरोलीच्या चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील गोविंदपुर नाल्याजवळील पुलावर पावसामुळे पाणी येत असल्याने वारंवार बंद होणारी वाहतूक लक्षात घेता शिवनी येथे मंजूर असलेल्या पुलाची उंची वाढवून नवीन पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गोविंदपुर नाल्यावरील पुलाच्या पाहणी प्रसंगी केले

यावर्षी सतत येणाऱ्या पावसामुळे व वैनगंगा नदीला येणाऱ्या दाबाच्या पाण्यामुळे गोविंदपूर नाल्याजवळ चामोर्शी -गडचिरोली मार्ग वारंवार बंद होत आहे.परिणामी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंबत चाललेली आहे. या नाल्यावरील पुलाचा मागील वर्षांचा इतिहास लक्षात घेता नवीन पुलाची उंची वाढविणे आवश्यक होते. परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून ज्या उंचीचे जुने पूल होते त्याच उंचीच्या नवीन पुलाचे बांधकाम केले. त्यामुळे या पुलावर सातत्याने पाणी येऊन वाहतूक थांबत आहे. त्यामुळे या पूलाची उंची वाढवणे आवश्यक आहे.

तसेच याच राष्ट्रीय महामार्गावर मंजूर असलेल्या व नव्याने होणाऱ्या शिवनी नाल्यावरील पुलाची उंची वाढवणे आवश्यक आहे. उंची न वाढवल्यास याही पुलावर वारंवार पाणी येऊन मार्ग बंद होत राहील व राष्ट्रीय महामार्गाचा काहीही लाभ जनतेला मिळणार नाही त्यामुळे याकडे गांभीर्याने बघून मंजूर असलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये दुरुस्ती करून पूलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Previous articleविदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा देवस्थानाचे विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील…..खा.अशोकजी नेते.
Next articleमंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.