Home रत्नागिरी “हर घर तिरंगा” उपक्रमाअंतर्गत भाजपच्यावतीने बाईक रॅली संपन्न

“हर घर तिरंगा” उपक्रमाअंतर्गत भाजपच्यावतीने बाईक रॅली संपन्न

129

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0021.jpg

“हर घर तिरंगा” उपक्रमाअंतर्गत भाजपच्यावतीने बाईक रॅली संपन्न                                               रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

भारताच्या स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष पर्वानिमित्त भारत माता की जय, वंदे मातरम, घर घर तिरंगा,भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो अश्या गगनभेदी घोषणा देत भारतीय जनता पार्टी रत्नागिरी (दक्षिण)युवा मोर्चा, महिला मोर्चा, सर्व आघाड्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन करून मारुती मंदिर सर्कल ते रामआळी, गोखले नाका, गाडीतळ, टिळक आळी, भारतीय जनता पार्टी कार्यालय प्रमोद महाजन क्रीडासंकुल येथे समाप्त करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड.दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, ऍड.बाबासाहेब परुळेकर, ऍड.अशोक कदम, सचिन करमरकर, मुन्ना चवंडे, प्रशांत डिंगणकर, राजू कीर, राजन फाळके, राजू भाटलेकर, राजन पटवर्धन, दादा ढेकणे, नितीन जाधव, निलेश आखाडे, महेंद्र मांडवकर, संदीप सुर्वे, भाई जठार लिलाधर भडकमकर, महावीर जैन, अमित जैन, मंदार भोळे तर तर महिला पदाधिकारी ऐश्वर्या जठार, प्राजक्ता रुमडे, तनया शिवलकर, मानसी करमरकर, प्रणाली रायकर, पल्लवी पाटील, संपदा तळेकर, वर्षा ढेकणे, सोनाली आंबेरकर तसेच युवामोर्चा प्रवीण देसाई, मंदार खणकर, गुरुप्रसाद फाटक, अनिष पटवर्धन, पमु पाटील, निशांत राजपाल आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

हर घर तिरंगा या उपक्रमाचे जिल्हा संयोजक विक्रम जैन यांनी या बाईक रॅलीचे अतिशय नियोजनबध्द आयोजन केले होते.