Home उतर महाराष्ट्र जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा व नवापूर तालुक्यांमध्ये विश्व आदिवासी गौरव...

जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा व नवापूर तालुक्यांमध्ये विश्व आदिवासी गौरव दिन   

141

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0012.jpg

जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा व नवापूर तालुक्यांमध्ये विश्व आदिवासी गौरव दिन     [ प्रतिनिधी सागर कांदळकर ]         (World Tribal Pride Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या आहे. पारंपारिक वेशभूषा, देखावा, ढोल नृत्य, विविध कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले जात आहे.

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयापासून शहरातील शिवाजी नाट्यमंदिर ते महाराणा प्रताप चौक दरम्यान रॅली काढून विश्व आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शहरातील प्रमुख मार्गांवरुन काढण्यात आलेल्या या भव्य शोभायात्रेत हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. या शोभायात्रेत ढोलताशांचा गजर, करत डीजेच्या तालावर आदिवासी बांधव थिरकत होते. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपारिक पोशाख परिधान केला होता.

हातात पारंपारिक शस्त्रे, ढोल, शिबली नृत्य करत आदिवासी बांधवांनी शोभायात्रेत आनंद लुटला.नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे सकाळपासूनच आदिवासी दिनाचा उत्सव जोरदार साजरा करण्यात येत आहे. शोभायात्रा काढून फटाक्यांची आतिषबाजी करत आदिवासी पारंपारिक देखावा नृत्य ढोल वाजून मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी समाज बांधव एकत्र जमले होते.

गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे आदिवासी दिन साजरा करण्यापासून आदिवासी बांधव वंचित होते. परंतु यंदा कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे लक्ष वेधले.

विसरवाडी येथे सरपंच बकाराम गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी लोकगीते आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांद्वारे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. युवकांद्वारे बाईक रॅली काढून विश्व आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Previous articleउमेद ,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
Next articleमहाराष्ट्रात येत्या ४८ तासात मुसळधार पाऊस ;सावधानतेचा इशारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.