Home नांदेड फिरत्या वाहनाद्वारे घरोघरी तिरंगा अभियानाच्या प्रचारास शुभारंभ

फिरत्या वाहनाद्वारे घरोघरी तिरंगा अभियानाच्या प्रचारास शुभारंभ

154

आशाताई बच्छाव

IMG-20220807-WA0048.jpg

फिरत्या वाहनाद्वारे घरोघरी तिरंगा अभियानाच्या प्रचारास शुभारंभ
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 7 :- घरोघरी तिरंगा मोहिमेच्या प्रसारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने फिरत्या वाहनाद्वारे नांदेड महानगरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू केली असून या वाहनाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वाहनाद्वारे दृकश्राव्य माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत घरोघरी तिरंगाबाबत अचूक संदेश पोहचण्यास मदत होईल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयेळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी, विकास माने, तहसीलदार किरण अंबेकर,नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी, काशीनाथ डांगे, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी व काही प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Previous articleअज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक जखमी
Next articleउपजिल्हा रुग्णालय मुखेड, रोटरी क्लब नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने कानाचे मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.