Home रत्नागिरी आमदार उदय सामंत हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत शिवसेना शाखेसमोर झळकले निषेधाचे बॅनर

आमदार उदय सामंत हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत शिवसेना शाखेसमोर झळकले निषेधाचे बॅनर

165

आशाताई बच्छाव

IMG-20220803-WA0015.jpg

आमदार उदय सामंत हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत शिवसेना शाखेसमोर झळकले निषेधाचे बॅनर               रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जात असताना जमावाने हल्ला केला. उदय सामंत यांच्यावर झालेल्या या हल्ल्याची बातमी रत्नागिरीत धडकताच साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेच्या समोरील शिरगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर निषेधाचा बॅनर लावण्यात आला आहे.

10 ते 15 फुटाच्या या बॅनर वर ‘आमदार उदय सामंत यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध! विचारांची लढाई ही विचारांनीच लढायची असते. असे हल्ले करणारे भ्याडच ! ‘ अशा प्रकारचा मजकूर असलेला निषेध व्यक्त करणारा मोठा बॅनर शिवसेनेच्या शाखेसमोरच लावण्यात आला आहे. सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान या भ्याड हलल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे.