Home रत्नागिरी खारवी विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांचा श्रीदेव महापुरुष देवस्थान पुर्णगड यांच्या वतीने...

खारवी विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांचा श्रीदेव महापुरुष देवस्थान पुर्णगड यांच्या वतीने सत्कार

147

आशाताई बच्छाव

IMG-20220803-WA0016.jpg

खारवी विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांचा श्रीदेव महापुरुष देवस्थान पुर्णगड यांच्या वतीने सत्कार

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- रत्नागिरी जिल्ह्यातील अग्रक्रमाने नाव घेतल्या जाणाऱ्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरीच्या अतुलनीय असे काम करणाऱ्या संचालकांचा श्रीदेव महापुरुष देवस्थान पुर्णगड यांच्या वतीने आयोजित सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्ताने रक्तदान शिबिर, भजनाची डबलबारीबरोबरच सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी, उपाध्यक्ष सुधीर वासावे, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष कमलाकर हेदवकर, संचालक मदन डोर्लेकर, संचालक कृष्णा तांडेल व तज्ञ संचालक अरविंद डोर्लेकर यांचा यांचा श्रीदेव महापुरुष देवस्थान पुर्णगड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक मंडळ व जेष्ठ रंगकर्मी राम सारंग, भजन सम्राट भगवान बुवा लोकरे भजन क्षेत्रातील नामांकित कोकणरत्न बुवा द्वारकानाथ नाटेकर अशी समाजातील नामांकित मंडळी एकत्र येऊन समाजातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.