Home कोल्हापूर धैर्यशील मानेंना मतदार धडा शिकवतील= राजू शेट्टी.

धैर्यशील मानेंना मतदार धडा शिकवतील= राजू शेट्टी.

161

आशाताई बच्छाव

IMG-20220730-WA0042.jpg

धैर्यशील मानेंना मतदार धडा शिकवतील= राजू शेट्टी.

कोल्हापूर पेठ वडगाव राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क : मी लोकसभा लढवणार आणि जिंकणार ही असा आत्मविश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. शिंदे गटात जाऊन मतदारांचा विश्वासघात केलाय त्यांना मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. विरोधात लोकसभा लढवणार आणि जिंकणार ही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शेट्टी यांनी शुक्रवारी दुपारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
. ना भाजपचा ना महाविकास आघाडीचा मी स्वतंत्र आहे असे ते म्हणाले. खरीप हंगामाच्या आधी कृषिमंत्र्यांनी जबाबदारीने काम करायला हवे. पण आपले कृषिमंत्री हवा पालट करायला गुवाहाटीला गेले. आता तर महिनाभर राज्याला कृषी मंत्री नाही. 23 जिल्ह्यातील आठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. बियाणांचा सुळसुळाट झाला आहे. रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. पण या समस्या सोडवण्याऐवजी राज्यात मोठे राजकारण सुरू आहे असेही शेट्टी म्हणाले.
. कारखाना प्रमाणे चांगले दिवस शेतकऱ्यांनाही यावेत. 1 हजार कोटी ५३६रुपयांची एफआरपी थकीत आहे. महाविकास आघाडी सरकारने दोन हप्त्यात एफआरपी द्यावा असा कायदा मंजूर करून घेतला. आताही थकबाकी व्याजासह शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी आयुक्त यांच्या कडे केली आहे. ऑइल कंपन्यांनी पेट्रोल पंपासाठी जशी एकच संगणक प्रणाली विकसित केली आहे. व कारखान्यांच्या वजन काट्यासाठी करावी. त्यांनी ती मान्य केली असेही शेट्टी म्हणाले.