Home गडचिरोली खासदार, आमदार धानोरकर, दाम्पत्यांच्या जनसंपर्क कार्यालयाला अजित पवारांची सदिच्छा भेट पुरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात...

खासदार, आमदार धानोरकर, दाम्पत्यांच्या जनसंपर्क कार्यालयाला अजित पवारांची सदिच्छा भेट पुरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात चर्चा

121

आशाताई बच्छाव

IMG-20220728-WA0054.jpg

खासदार, आमदार धानोरकर, दाम्पत्यांच्या जनसंपर्क कार्यालयाला अजित पवारांची सदिच्छा भेट

पुरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात चर्चा

७५ हजार रुपये हेक्टरी निधी देण्याची मोठी मागणी शासनाकडे मांडणार

चंद्रपूर/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : मागील १५ दिवसापासून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पाऊस असल्याने पूरस्थिती उद्भवली होती. त्याची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातील संवेदनशील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पाहणी दौरा केला. यावेळी खासदार बाळू धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांना भगवान गौतम बुद्धांची लाकडी कोरीव प्रतिमा भेट देण्यात आली. सोबतच विविध विषयावर चर्चा केली.

याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार देवराव भांडेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिशभाऊ वारजूरकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विनोद दत्तात्रय, महाराष्ट्र प्रदेश महासचिव विजय नळे,शहर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, शहर महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्षा संगीता अमृतकर, शहर महिला जिल्हा ग्रामीण अध्यक्षा नम्रता ठेमस्कर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अहिरकर, काँग्रेस नेते प्रकाश पाटील मारकवार, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, नगर परिषद बल्लारपूर माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, महिला नेते ऍड. मेघा भाले, माजी नगरसेविका सुनीता लोढीया, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, माजी नगरसेविका सुनीता अग्रवाल, चंद्रपूर तालुका अध्यक्ष शामकांत थेरे, सेवादल महिला अध्यक्ष स्वाती त्रिवेदी, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष अनुताई दहेगावकर, अश्विनी खोब्रागडे, सुनील पाटील, माजी नगरसेवक प्रशांत दानव, राज यादव, सौरभ ठोंभरे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. धानोरकर दाम्पत्यांनी पूर परिस्थितीवर केलेल्या सूचना तात्काळ शासन दरबारी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच ७५ हजार रुपये हेक्टरी निधी देण्याची मोठी मागणी शासनाकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याकरिता देखील त्वरित निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पडू असे देखील ते यावेळी म्हणाले.

Previous articleजिंतूर तालुक्यातील २२ गणांची आरक्षण सोडत जाहीर
Next articleकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले 29 जुलै रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.