Home नाशिक देवळा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तिन्ही गट आरक्षित झाल्याने इच्छुंकाच्या पुर्वतयारीवर फिरले पाणी!

देवळा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तिन्ही गट आरक्षित झाल्याने इच्छुंकाच्या पुर्वतयारीवर फिरले पाणी!

156

आशाताई बच्छाव

Screenshot_20220728-165744_Google.jpg

( भिला आहेर युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा प्रतिनिधी:- देवळा तालुक्यातील जिल्हा परिषद तीनही गट आरक्षित इच्छुकांचा हिरमोड.
जिल्हा परिषदेचे देवळा तालुक्यातील उमराणे, खर्डे व लोहोणेर हे तिन्ही गट आरक्षित झाल्याने राजकीय पुढाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे तालुक्यातील उमराणे गट हाअनुसूचित जामाती पुरुष प्रवर्गसाठी,खर्डे गट हा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गसाठी तर लोहोणेर गट हा अनुसूचित जमाती पुरुष प्रवर्गसाठी राखीव झाले आहेत.
दरम्यान उमराणे जिल्हा परिषद गटातून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई प्रविण पवार यांचे पती प्रविण अर्जुनराव पवार यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी देवळा पंचायत समितीचे माजी सभापती केदा शिरसाठ यांनी केली आहे. डॉ. भारतीताई पवार यांनी देखील २०१२च्या जिल्हा परिषद निवडणुकीत उमराणे गटातून उमेदवारी केली होती त्यावेळी त्या जिल्ह्यातून सर्वाधिक बारा हजार मतांनी विजयी झाल्या होत्या त्यानंतर लोकसभा निवडणुकीत देखील देवळा तालुक्यातुन त्यांना सर्वाधिक मतदान मिळाले होते. त्यामुळे आता त्यांचे पती प्रविण पवार यांनी उमेदवारी करावी अशी मागणी केदा शिरसाठ, मेशी विकास सोसायटीचे सभापती राजू शिरसाठ, मोतीराम शिरसाठ, पंडित शिरसाठ, बाबूलाल चव्हाण, तुषार शिरसाठ यांनी केली आहे

Previous articleपी.एम.एल.ए.कायद्याला मंजुरी
Next articleगडचिरोली शहरात रामनगर वार्डात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.