Home नांदेड पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा — बालाजी बच्चेवार भाजपा...

पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा — बालाजी बच्चेवार भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य

77
0

आशाताई बच्छाव

IMG-20220716-WA0046.jpg

पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा — बालाजी बच्चेवार
भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

महाराष्ट्रात नव्याने आलेल्या शिंदे व फडणीसांच्या सरकारने.पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी स्वागत केले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोनदा कपात केली. त्याचवेळी केंद्राने राज्यात सत्तेत असलेल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करावी अशी मागणी केली होती. केंद्र सरकाच्या निर्णयाचे अनुकरण करत भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी इंधनावरील करात कपात केली होती. महाविकास आघाडी सरकारने मात्र इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्या-आल्या इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करत सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत आहे, असेही बालाजी बच्चेवार यांनी नमूद केले आहे.
केंद्र आणि राज्य यांच्या सहकार्याचे नवे पर्व महाराष्ट्रात सुरू झाले असून ‘सबका साथ, सबका विकास’ हा पंतप्रधान मोदी यांचा मंत्र श्री. शिंदे व श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देईल असा विश्वास भाजपा प्रांत कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केला.

Previous articleआ.मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून जिंतूरात नाट्यगृहासाठी निधी मंजूर
Next articleराज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका असतील त्या टप्प्यावर 30 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलल्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here