Home गडचिरोली जीर्ण तसेच धोकादायक इमारती मालकांना नगर परिषद, गडचिरेाली यांचे सूचना

जीर्ण तसेच धोकादायक इमारती मालकांना नगर परिषद, गडचिरेाली यांचे सूचना

111

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0037.jpg

जीर्ण तसेच धोकादायक इमारती मालकांना नगर परिषद, गडचिरेाली यांचे सूचना

गडचिरोली,(जिमाका)दि.14: जीर्ण, मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे शहरात जिवित व वित्तहानी होऊ नये यासाठी नगर परिषद तर्फे मान्सुनपुर्व सर्व्हक्षण करुन 39 धोकादायक इमारत पाडण्याबाबत नोटीस बजावलेले आहे. तसेच मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीचे अनुषंगाने पुन्हा प्रत्यक्ष सर्व्हे करुन त्यातील 12 अतिधोकादायक इमारती निश्चित केलेल्या आहेत व अशा इमारतीचे मालक, वहिवाटदार यांना 24 तासाचे आत स्वत:च्या स्तरावर प्रत्यक्ष भेटून नोटीस बजावून इमारती रिकाम्या करण्यास पाडुन टाकण्यास नोटीस बजावण्यात आले आहेत.
मालमत्ता धारक, किरायेदार यांनी नगर परिषदेचे नोटिसला न जुमानता जीर्ण इमारतीचा वापर सुरुच ठेवलेला आहे. अशा परिस्थितीत सद्या सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे जीर्ण इमारत कोसळुन जिवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी संबंधीत मालमत्ताधारकांनी 24 तासाचे आत जीर्ण इमारतींचा वापर थांबवून इमारत मोकळी करुन स्वत:च्या स्तरावर पाडून टाकावे अन्यथा नगर पालिका प्रशासनातर्फे अति धोकादायक इमारत रिकामी करुन पाडण्यास येईल व याकरीता नगर परिषदेस येणारा खर्च संबंधिताकडून मालमत्ता कराचे थकबाकीप्रमाणे वसुल करण्यात येईल याची संबंधीत मालमत्ताधारकांनी नोंद घ्यावी असे मुख्याधिकारी, नगरपरिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Previous articleअन्यथा ती दोन गावे वाहून गेली असती !
Next articleनरसी येथे कंटेनरच्या धडकेत एक जण ठार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.