Home गुन्हेगारी सप्तशृंगी गडावर सुरक्षा रक्षकाचा निर्घृणरित्या खुन

सप्तशृंगी गडावर सुरक्षा रक्षकाचा निर्घृणरित्या खुन

229

आशाताई बच्छाव

Screenshot_20220714-190919_Google.jpg

(भिला आहेर युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा :- सप्तशृंगगडावर सुरक्षारक्षकाचा खून ( Murder) झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गडावरील गणेश घाटाच्या धबधब्यापुढे रात्री 9 वाजेच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या युवकाचा खून झाला असून सप्तशृंग गडावर देवी संस्थान मध्ये सुरक्षारक्षक या पदावर तो कार्यरत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदुरी ते सप्तशृंग गड या दहा किलोमीटरच्या अंतरात गणेश घाटाच्या धबधब्याजवळ एक युवक जखमी असल्याचे गडावर दर्शनासाठी येणाऱ्या काही भाविकांनी पाहिले. त्यांनी सप्तशृंगगडावरील न्यासाच्या कार्यालयास ही माहीती दिली. घटनास्थळावर न्यास प्रशासनाने रुग्णवाहिका पाठविली व वरीष्ठ अधिकारी व पोलिसांना या
घटनेची माहीती देण्यात आली.
पोलीसांनी घटनास्थळावर येऊन तपास केला असता मृतदेहाची ओळख पटली असून अर्जुन पवार (30) रा. सप्तशृंगगड असे या युवकाचे नाव आहे. हा युवक सप्तशृंग गडावर देवी संस्थान मध्ये सुरक्षारक्षक या पदावर कार्यरत होता अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली. याप्रकरणी कळवण पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेमुळे सप्तशृंगगडावर खळबळ उडाली असून अधिक तपास कळवण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक समाधान नागरे करीत आहेत.

Previous articleसार्थकी मल्टीस्पेशालिटी सेंटरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.
Next articleअमृतेश्वर मठ संस्थान जिंतूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.